प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’तील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता ऋषी सक्सेना नकारात्मक भूमिकेत झळकत आहे. नुकतंच ऋषीने त्याच्या पात्रासाठीचा लूक कसा केला, याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सुभेदार या चित्रपटाचा मेकअप आर्टिस्ट स्वप्निल चिमणे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अभिनेता ऋषी सक्सेना हा कुबादखानचे पात्र साकारताना दिसत आहे. यावेळी त्याला दाढी, एका डोळ्या लेन्स आणि केसांचा वीग लावताना दिसत आहे. तसेच त्याला मेकअपही करताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”
ऋषी सक्सेनाने नुकतंच हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने “कुबादखान” असे कॅप्शन दिले आहे. ऋषीने साकारलेले हे पात्र नकारात्मक आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
दरम्यान ‘सुभेदार’ हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत ५.०६ कोटींचा गल्ला जमवला आहे.
ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. तर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.