बॉलिवूडच्या मराठमोळं जोडपं रितेश- जिनिलीया सध्या चर्चेत आहेत, त्यांचा पहिलावहिला मराठी चित्रपट ‘वेड’ हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची झलक आल्यापासूनच सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु ती म्हणजे हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या सगळ्यावर आता दिग्दर्शक अभिनेता दिग्दर्शक रितेश देशमुखने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात त्याने चित्रपटाबद्दल माहिती दिली. एका पत्रकाराने त्याला विचारले की, “हा चित्रपट माजिलीचा रिमेक आहे का?” त्यावर रितेश म्हणाला, “हो हा चित्रपट ‘माजिली’वरून प्रेरित आहे. हा चित्रपट बनवताना आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आम्ही हा चित्रपट मराठीत रूपांतरित करताना विशेष काळजी घेतली आहे. ज्यांनी ‘माजिली’ बघितला आहे त्यांनी हा चित्रपट बघितला तर त्यांना यात नवे बघायला मिळणार आहेत.” ‘माजिली’ हा तेलगू चित्रपट असून त्यात नागा चैतन्य आणि समंथा मुख्य भूमिकेत आहेत.

Video : वाढदिवसानंतर रजनीकांत लेकीसह तिरुपतीच्या चरणी; दर्शन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच ट्रेलरमध्ये चित्रपटातील इतर कलाकार विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर आदी कलाकार दिसत आहेत.

३० डिसेंबरला त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुखनेच केलं आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटसृष्टी पदार्पण करत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi ved director ritiesh deshmukh open up about remake of majili film spg