अभिनयासह लेखन, दिग्दर्शन, निर्मिती अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीत आहे. त्यापैकी एक म्हणजे मधुगंधा कुलकर्णी. नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमांमध्ये उत्कृष्ट लेखिका आणि अभिनेत्री म्हणून मधुगंधा ओळखली जाते. अशा या हरहुन्नरी मधुगंधाने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे; तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

१ जानेवारी २०२५ला ‘मु.पो. बोंबिलवाडी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी परेश मोकाशी यांनी सांभाळली आहे. तर मधुगंधा कुलकर्णी चित्रपटाची निर्माती आहे. याच आगामी नव्या चित्रपटाच्या निमित्ताने मधुगंधाने पोस्ट लिहिली आहे.

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Tejswini Pandit
“लवकर बरं व्हायचं आहे”, तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय? पोस्टवर स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधवने केल्या कमेंट्स

हेही वाचा – Bigg Boss 18: अनंत अंबानीच्या लग्नानंतर जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणी पुन्हा येणार भारतात, सलमान खानच्या शोमध्ये होणार सहभागी?

‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या दोन चित्रपटांचं पोस्ट शेअर करत मधुगंधा कुलकर्णीने लिहिलं आहे, “माझं बालपण पंढरपुरात गेलं. वडील खूप लहान असताना वारले. त्यांच्या मागे मुलांना शिकवून मोठं करण्याची धडपड माझी आई करत होती. तिचा आटापिटा कळत होता म्हणून मी आणि माझ्या भावाने बांगड्या विकण्याचा छोटा व्यवसाय केला…आणि त्या अनुभवाचा पुढे झाला एलिझाबेथ एकादशी…दहा वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवला…ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…फक्त पॅशन होती… स्वतःचे पैसे घालून सिनेमा बनवला…परेशचे बाबा पाठीशी उभे राहिले…माझं गाव पंढरपूर मदतीला धावून आलं…शैलेश बडवे, श्रीकांत बडवे…खूप मदत झाली… आमची चित्रपटातली मुलांची फौज…सगळे चित्रपटाच्या पाठीशी उभे होते.”

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…

पुढे मधुगंधा कुलकर्णीने लिहिलं की, चित्रपट बनवला पण पुढे काय करायचं माहीत नव्हतं…त्यावेळी ‘झी स्टुडिओ’च्या नावाचा खूप दबदबा होता…निखिल साने सिनेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. उत्तम मार्केट केला…घरोघरी पोहोचवला. सगळे अवॉर्डज मिळाले. नॅशनल सुवर्ण कमळ…बॉक्स ऑफिसलाही धमाका…एलिझाबेथ माझ्यासाठी पहिला वाहिला निर्मितीचा अनुभव होता…सुखद झाला निखिल साने यांच्या सोबतीने, पाठिंब्याने…दहा वर्षापूर्वी हे सगळं झालं.”

“पुढे खूप टक्केटोणपे, खूप चांगले वाईट अनुभव घेतले. चांगल्या अनुभवांनी प्रोत्साहन दिलं तर वाईट अनुभवांनी शिक्षण! ५ सिनेमे बनवले, त्यातल्या तीन सिनेमांना नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि सर्व सिनेमांना रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम. त्याबळावरच पुन्हा एकदा मोठी झेप घेतोय आता ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’. वेगळा विषय आणि सुसाट मनोरंजन हा उद्देश. Loaded with laughter याचा प्रत्यय तो चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाला येईलच. १ जानेवारी २०२५ पासून आमचा ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आपला’ होणार… हेतू प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन हाच आहे. रसिकहो आमच्या सगळ्या चित्रपटावर तुम्ही भरभरून प्रेम केलंत तसंच या चित्रपटाला ही तुमचं उदंड प्रेम आणि प्रतिसाद मिळो ही नटेश्वर चरणी प्रार्थना,” अशी सुंदर पोस्ट मधुगंधा कुलकर्णीने लिहिली आहे.

हेही वाचा – भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, ‘मु.पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह आनंद इंगळे, मनमीत पेम, प्रणव रावराणे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, रितिका श्रोती, दिप्ती लेले असे अनेक कलाकार झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘मु.पो. बोंबिलवाडी’ चित्रपटाचं शीर्षकगीत प्रदर्शित झालं होतं.

Story img Loader