आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना पाहायला मिळाले. नुकतंच लेखक क्षितिज पटवर्धनने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्षितीज पटवर्धनने नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. यात त्याने ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याबरोबरच त्याने या चित्रपटाचे कौतुकही केले आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

क्षितीज पटवर्धनची पोस्ट

“आत्मपॅम्फ्लेट हि मराठी प्रेक्षकांची लिटमस टेस्ट आहे.”
कुणाचीही अस्मिता नसलेला सिनेमा मराठीत चालणं फार गरजेचं आहे असं विधान मी मागे एका राउंड टेबल मध्ये केलं होतं. त्याचीच प्रचिती काल आली. जात, धर्म, पंथ, लिंग, इतिहास, राजकारण या सगळ्या अस्मितांच्या चौकटीमध्ये ना बसणारा पण या सगळ्यांच्या आडवा छेद काढणारा आत्मपॅम्फ्लेट काल पाहिला आणि वाटलं हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहिला पाहिजे.
आशिष माझा शाळेतला सिनियर, ज्या शाळेत त्याची हि गोष्ट फुलली, त्याच शाळेत त्याच वर्गवाणी वरून त्याचं नाव घेतलेलं मी ऐकलंय, तेव्हापासून त्याच्याबदल सुप्त आदर आणि कुतूहल दोन्ही होतं. सिनेमात ते पुन्हा पाहून शाळेचे सगळे दिवस, घटना (आपलं ही आत्मपॅम्फ्लेट ;)) असं सगळं लख्ख आठवलं.

पूर्वीच्या मनोरंजक जाहिरातींसारखा (मनो रंजन का बाप) हा सिनेमा मांडलाय, त्यामध्ये विनोद, उपहास, कोट्या, नाट्य, सामाजिक, राजकीय बदल आणि संदेश असं सगळं आहे. ते सगळं अतिशय परिणामकारक आहे. मुख्य म्हणजे त्याला अप्रतिम दृश्यात्मकता आहे. पणजी शाळेत जात असताना मागे मांजरी पासून वाघिणीची चित्र असणं या सारख्या अनेक सहज सुंदर प्रतीकांनी हा सिनेमा सजलाय.
शाळा, त्यातलं प्रेम, त्यासाठी खाल्लेल्या खस्ता, स्वतः बद्दल तयार होणारा गंड, भवताला बद्दल पडलेले प्रश्न, समोर कायम असेलल्या दोन वाटा ह्या सगळ्यातून सच्चेपणाने केलेली प्रेमाची निवड या सगळ्या वळणांवरून हा सिनेमा पुढे सरकतो आणि शेवटी शेवटी अतिशयोक्ती कडे जातो. या सगळ्याला परेशचं तिरकस निवेदन आहे. फक्त सुरुवातीला मजेदार वाटणारं हे निवेदन नंतर नंतर आगाऊ आणि रिपीटेटिव्ह वाटायला लागलं.

हा सिनेमा जितका आशिषचा आहे तितकाच अविनाशचा आहे, (भीम मुडे ने अप्रतिम काम केलंय) आपलया पालकांनी ऐंशी नव्वदच्या दशकांत मुलांना जगण्याचे जे धडे वागण्यातून दिले त्याची सुंदर झलक अविनाश बेंडे मध्ये आहे, त्यांचा हसतमुख चेहरा सिनेमा संपला तरी आठवत रहातॊ. त्यांच्या पात्राला घेऊन आत्म पॅम्फ्लेटचा उत्तम प्रिक्वेल होऊ शकतो. मुलांची आणि पालकांची कामं सुंदर.

टँरेन्टीनो एका ठिकाणी म्हणाला होता कि “मेक इट पर्सनल इनफ सो यु फील एम्बॅरॅस्ड टू शेअर इट!” अनेक कलाकार वर्षानुवर्ष काम करूनही हे साधू शकत नाहीत, ते आशिषने पहिल्याच सिनेमात केलंय. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस (चांगल्या अर्थी) फार डेंजरस कलाकार होतो.

सिनेमा बद्दल ज्या गोष्टी खटकल्या त्या त्याला भेटून सांगेनच, पण तूर्तास हा सिनेमा बघणं आणि चालणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही अस्मितेशिवाय फक्त कलाकृती म्हणून सिनेमा चालला तर त्यात करणाऱ्यांचं ही यश आहे आणि बघणाऱ्यांचंही! नक्की पहा!!, असे क्षितीज पटवर्धनने म्हटले आहे.

आणखी वाचा : “कदाचित म्हणूनच हे धाडस…”, घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्वप्नील जोशीचे चाहत्यांसाठी सरप्राईज, म्हणाला “जगातील सर्व स्त्रियांना…”

दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला.