भारतीय रसिकांमध्ये क्रिकेटचे वेड काहीही केलं तरी कमी होत नाही. चाहते हे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूसाठी काय करतील याचा काही नेम नाही. त्यातही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची गोष्ट काही औरच… सचिनसाठी चाहते निरनिराळ्या मार्गाने त्यांच्याबद्दलच आपलं प्रेम व्यक्त करत असतात. सचिनप्रती असलेल्या प्रेमापोटी एका चाहत्याने थेट चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘तेंडल्या’ असे या चित्रपटाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सध्या त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

‘अश्वमेध मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘तेंडल्या’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात गावातील काही मुलांच्या क्रिकेट खेळण्याने होते. ही मुलं गावातील शेतात क्रिकेट खेळत असतात. त्यानंतर एक मुलगा हा गोलंदाजी करताना दाखवलं आहे. त्यानंतर ही सर्व क्रिकेट खेळणारी मुले जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. या चित्रपटाची कथा ही खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचं सचिन तेंडुलकरवर असणारं प्रेम आणि क्रिकेट यावर अवलंबून आहे, अशी माहिती क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी दिली.
आणखी वाचा : “माझे जाडेपण…” वजनावरुन खिल्ली उडवणाऱ्यांना विशाखा सुभेदारने दिलेले सडेतोड उत्तर

Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
Milind Gawali
मिलिंद गवळी यांनी १०३ वर्षे जुन्या ‘या’ वास्तूला दिली भेट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “वेगळ्या विश्वात…”
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?

या चित्रपटाला पाच राज्य आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती करोना काळापूर्वी झाली होती. २४ एप्रिल २०२० रोजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडलं.

‘तेंडल्या’ हा चित्रपट सचिन तेंडुलकरनेही पाहिला असल्याची माहिती सुनंदन लेले यांनी दिली. “सचिनने हा चित्रपट पाहिला. त्याला हा चित्रपट प्रचंड आवडला. त्यानेही या चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक केले आहे”, असे ते म्हणाले.

दरम्यान या चित्रपटात झळकणारे कलाकार शूटिंगच्या वेळी ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण घेत होते. यात ओंकार गायकवाड, स्वप्नील पाडळकर, राज कोळी, हर्षद केसरे, महेश जाधव, आकाश तिकोटी हे कलाकार दिसणार आहे. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader