‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने मागच्या वर्षी निधन झालं. आत्महत्या करत मयुरीच्या पतीने जीवन संपवलं. पती आशुतोषच्या जाण्याच्या धक्क्यातून अभिनेत्री मयुरी देशमुख स्वतः सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा जोमानं उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. नुकतीच मयुरी देशमुख व्हिएतनाम ट्रीपवर गेली असून कुटुंबीयांसह सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ज्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण एका युजरने यावरून मयुरीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मयुरी देशमुखने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिएतनाम ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर कमेंट करताना एका युजरने मयुरीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या युजरने मयुरीच्या फोटोवर कमेंट करताना तिच्या पतीच्या निधनाचा उल्लेख केला आहे. पतीच्या निधनाला वर्ष झालेलं नसतानाही तू फिरतेयस असं म्हणत या युजरने मयुरीवर टीका केली आहे. पण या युजरला मयुरीने चोख उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? असं विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राचं उत्तर, म्हणाला…

मयुरीच्या फोटोवर कमेंट करताना युजरने लिहिलं, “अंग मयुरे नवरा स्वर्गवास होऊन एक वर्ष झालं नाही आणि तू फिरायला लागलीस, फोटो काढायला लागलीस, एन्जॉय करायला लागलीस.” मयुरीने ही कमेंट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना लिहिलं, “जर आपण लोकांबद्दल विशिष्ट मत तयार न करता किंवा त्यांना जज न करता जगू दिलं तर हे जग खूप हेल्दी राहील.” तिने पुढे लिहिलं, “स्वतःचा आनंद शोधणं सामान्य असायला हवं.”

आणखी वाचा-‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता झळकणार मराठी चित्रपटात, पोस्ट शेअर करत म्हणाला…

मयुरी देशमुखची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. मयुरी देशमुख हिचा २० जानेवारी २०१६ रोजी आशुतोष भाकरेशी लग्न झालं होतं. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर लॉकडाउनपूर्वी मयुरीचे ‘तिसरे बादशाह हम’ हे नाटक रंगभूमीवर सुरु होते. मयुरी देशमुख कामाबद्दल बोलायचं तर तिने ‘इमली’ या मालिकेत साकारलेली मालिनी ही भूमिका बरीच गाजली.