भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मंडळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसंच नेटकरी देखील सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सांस्कृतिक, वनविभाग व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट शेअर करणारी दुसरी तिसरी कोणी नसून मेघा धाडे आहे. मेघा धाडेने ( Megha Dhade ) सुंदर पोस्ट लिहीत सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर झाली चूक, ‘त्या’ पोस्टवरून मागितली माफी
मेघाचा धाडेची खास पोस्ट वाचा
मेघाने सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “ज्यांच्या नावापुढे विकास पुरुष ही उपाधी अतिशय शोभून दिसते, जे वाळवंटातही नंदनवन खुलवू शकतात अशी प्रचंड क्षमता असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते आणि सांस्कृतिक, वनविभाग व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. सुधीर भाऊ आपल्या कार्याचा ओघ हा कायम असाच सुरू असू दे, आपण कायम सुखात, आनंदात असू दे, आपली प्रकृती ही कायम ठणठणीत असू दे; जेणेकरून आपण घेतलेले लोकसेवेचे हे व्रत अखंड अविरत चालू राहील अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा.”
सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यतिरिक्त अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देखील मेघाने ( Megha Dhade ) खास पोस्ट शेअर केली आहे. प्रिया बेर्डे यांच्याबरोबरचा जुना फोटो पोस्ट करत तिनं लिहिलं आहे, “प्रिया ताई तुला आज वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा…आपण दोघी एकमेकांच्या हातात हात घेऊन आजपर्यंत आयुष्यात गेली अनेक वर्ष एकत्र वाटचाल करत आलो आणि प्रिय ताई तुला प्रॉमिस करते की तुझा हा हात मी कधी, कधी सोडणार नाही लव्ह यू प्रिया दी.”
हेही वाचा – सलील कुलकर्णी यांच्या नव्या हॉटेलचं नाव ‘बँगलोर कॅन्टीन’ का आहे? जाणून घ्या…
हेही वाचा – Video: “मन्या बाबू…”, ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला विदेशात, पोस्ट करत म्हणाले…
दरम्यान, अभिनेत्री मेघा धाडे ( Megha Dhade ) नेहमी सोशल मीडियावर आपली परखड मत व्यक्त करत असते. गेल्या वर्षी जून महिन्यात मेघाने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिनं भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.