अलीकडच्या काळात सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. कलाकारांनी शेअर केलेल्या विविध फोटो किंवा व्हिडीओ पोस्टवर नेटकरी कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत असतात. अनेकदा कलाकारांचं भरभरून कौतुक केलं जातं, तर काही वेळेस जरा काही गोष्ट खटकली की, नेटकरी या सेलिब्रिटींना ट्रोल करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बहुतांश मराठी कलाकार या ट्रोलर्सला जशास तसं उत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री मिताली मयेकर सध्या इटली फिरायला गेली आहे. सिद्धार्थ-मिताली दोघंही जोडीने इटलीत धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. इटलीला गेल्यावर तिकडचा लोकल पास्ता खाण्याचं एक वेगळं आकर्षण असतं. खवय्यांना याठिकाणी विविध प्रकारचे पास्ता खायला मिळतात. काहीजण तर खास फक्त मूळ पास्ता कसा लागतो याची चव चाखण्यासाठी इटलीची वारी करतात. “तुम्ही इटलीला जाऊन पास्ता खाता तेव्हा…” अशा कॅप्शनने मितालीने नुकताच पास्ता खातानाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

मितालीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी मितालीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिला इटलीमधील पास्ता आवडला नसल्याचे तर्कवितर्क लावले आहेत. परंतु, खरंतर तिकडे जाऊन आवडत्या पदार्थाचा आस्वाद घ्यायला मिळाल्यामुळे मिताली भारावून गेली असल्याचं तिचं “Crying out of happiness!” हे कॅप्शन वाचून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : सायली अर्जुनची घेणार शाळा! सोज्वळ सुनेचा नवा अवतार पाहून कल्पनाही झाली थक्क, पाहा नवीन प्रोमो

एका नेटकऱ्याने या पोस्टवर खोचक कमेंट करत “सॉरी पण, मला पास्ता आणि ही मुलगी आवडत नाही” असं लिहिलं आहे. यावर मितालीने देखील जशास तसं उत्तर दिलं आहे. “याचा अर्थ कोणत्याही चांगल्या गोष्टीची चव तुम्हाला समजतच नाही” असं लिहित अभिनेत्रीने पुढे हसण्याचे इमोजी जोडले आहेत. याशिवाय इतर ट्रोलर्सबद्दल अभिनेत्री लिहिते, “ज्यांनी माझ्या कॅप्शनचा अर्थ समजून न घेता… मला पास्ता आवडला नाही असा भ्रम करून घेतलाय त्या सगळ्याचं कौतुकचं केलं पाहिजे. विशेष म्हणजे काहीजण या पास्ताला नूडल्स म्हणत आहेत. या पास्ताला ‘पिसी’ म्हणतात आणि पास्ताचा हा प्रकार स्पेगेटी पास्तापेक्षा जरा जाड असतो. मला आशा आहे की, तुम्ही सर्वजण आज काहीतरी नवीन शिकलात चिअर्स!”

मिताली मयेकरच्या पोस्टवरील कमेंट

दरम्यान, सिद्धार्थ-मितालीबद्दल सांगायचं झालं, तर हे दोघंही लग्नानंतर दरवर्षी न चुकता परदेशवारीवर जातात. गेल्यावर्षी ही जोडी पॅरिस फिरायला गेली होती. यावेळी सिद्धार्थ-मिताली इटलीत धमाल करत आहेत. त्याच्या ट्रिपच्या सुंदर फोटोंनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitali mayekar enjoying in italy actress savage replies to netizens who comment on her pasta eating video sva 00