सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारही जल्लोषात दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. यंदाच्या दिवाळीत काही कलाकारांनी घर, कुणी गाडी तर काहींनी महागडी वस्तू खरेदी केली आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडीनेही एकमेकांना महागड्या वस्तू देत जल्लोषात दिवाळी साजरी केली.
सिद्धार्थ आणि मिताली मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय कपल आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळते. सोशल मीडियावर दोघे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. पाडव्यानिमित्त मितालीने सिद्धार्थला एक महागडी वस्तू भेट म्हणून दिली आहे.
मितालीने पाडव्याची भेट म्हणून सिद्धार्थला राडो (rado) कंपनीचे महागडे घडयाळ दिले आहे. या घड्याळाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्रामवर मितालीने दिलेल्या भेटवस्तूचा व्हिडीओ टाकला आहे. व्हिडीओ शेअर करीत सिद्धार्थने “Wifey has no chill. मी अजूनही थरथरत आहे” अशी कॅप्शनही दिली आहे. सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सायली संजीव, आरोह वेलणकरसारख्या अनेक कलाकारांसह चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करीत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच मिताली आणि सिद्धार्थने नवीकोरी आलिशान गाडी खऱेदी केली होती. दोघांनी आपल्या सोशल मीडियावर याचे फोटोही शेअर केले होते. मितालीने “माझी लक्ष्मी आली,” असे म्हणत या कारबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. नवी कार घेतल्यानंतर इतर कलाकारांसह अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.