सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ कामानिमित्त लंडनला होता. नुकताच तो मुंबईत परतला आहे. यावेळी मितालीने त्याचे कसे स्वागत केले याची खास झलक अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’नंतर अंकुश चौधरी दिसणार नव्या भूमिकेत, शेअर केली चित्रपटाची पहिली झलक

एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यावर सिद्धार्थ-मितालीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही वैयक्तिक कामामध्ये कितीही व्यग्र असले तरी ते एकमेकांना अधिकाधिक वेळ देताना दिसतात. अलीकडेच त्यांच्या मुंबईतील नव्या घराला एक वर्ष पूर्ण झाले, तेव्हा सिद्धार्थ लंडनला होता. आता तो बऱ्याच दिवसांनी घरी आल्याने मितालीने त्याला सरप्राईज दिले आहे.

हेही वाचा : “कॉलेजच्या मॅडमकडे मंगळसूत्र मागितले अन्…”, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्रीने सांगितला नाटकाच्या प्रयोगाचा किस्सा

सिद्धार्थचे खास गिप्ट देऊन मितालीने स्वागत केले आहे. मितालीने त्याला गेम खेळण्यासाठी ‘पीएस ५’ (PS 5) हे प्लेस्टेशन गिफ्ट दिले आहे. या गिफ्टचा फोटो सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यावर “बायकोचं प्रेम” हे कॅप्शन दिले आहे. लंडनहून आल्यावर बऱ्याच दिवसांनी अभिनेत्याने घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. डाळ, बटाट्याची भाजी, चपाती अशा परिपूर्ण जेवणाच्या ताटाचा फोटो सिद्धार्थने शेअर केला आहे.

हेही वाचा : Ajmer 92 : “तरुणींचे अपहरण, बलात्कार अन्…”, ३१ वर्षांपूर्वी २५० मुलींबरोबर काय घडलं? ‘अजमेर ९२’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सिद्धार्थसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitali mayekar gave special gift to husband siddharth chandekar shared photo sva 00