सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ चित्रपटाची चर्चा सुरु असल्याने मितालीने यावर खास व्हिडीओ बनवला आहे. ‘बार्बी’मध्ये गुलाबी रंगाची थीम अधोरेखित केली जाते. त्यामुळे मितालीने गुलाबी रंगाच्या साड्या नेसून बार्बीचे भारतीय व्हर्जन असा व्हिडीओ बनवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Bigg Boss OTT : ‘वेड’ फेम अभिनेत्री जिया शंकरच्या ‘त्या’ कृतीवर सलमान खान भडकला; म्हणाला, “साबणाचे पाणी प्यायला देऊन…”

मिताली मयेकरने शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मितालीने या व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाच्या ६ साड्या विविध स्टाइलमध्ये नेसल्या आहेत. या व्हिडीओला मितालीने “जर बार्बी भारतीय असती तर?” असे कॅप्शन दिले आहे. यामधील तिचा मराठमोळा लूक लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा : Video : “तुझी लायकी नाही फक्त सैफमुळे…”, इब्राहिम अली खानची वागणूक पाहून नेटकरी संतापले, व्हिडीओ व्हायरल

मितालीच्या या व्हिडीओवर तिचा नवरा आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने खास कमेंट केली आहे. तो लिहितो, “बार्बी शोबत लगीन करायचंय…करू दे ना वं.” त्याच्या या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिद्धार्थला मितालीने लाडात ‘ओके’ असे उत्तर दिले आहे. सिद्धार्थची कमेंट पाहून काही नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत “तुमचे लग्न एकदा झाले ना? अजून किती वेळा करणार?” असा प्रश्न दोघांना विचारला आहे.

हेही वाचा : “ब्रा, ओल्ड मॉन्क…”, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील आक्षेपार्ह शब्दांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

मितालीने या व्हिडीओला बार्बीचे गाणे जोडले असून संपूर्ण गुलाबी थीममध्ये हा व्हिडीओ सूट करण्यात आला आहे. सिद्धार्थशिवाय या व्हिडीओवर सानिया चौधरी, गायत्री दातार, रसिका सुनील या अभिनेत्रींनी प्रतिक्रिया देत मितालीचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitali mayekar shared indian edition barbie video husband siddharth chandekar comments got attention sva 00