मराठीतील ‘हर हर महादेव’ हा ऐतिहासिक चित्रपट २५ ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला आला. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटात सह्याद्रीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज आहे. राज ठाकरेंच्या कणखर आवाजातील टीझर पाहूनच प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. राज ठाकरेंनी या चित्रपटासाठी आवाज कसा रेकॉर्ड केला याचा व्हिडीओ समोर आला आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटातील राज ठाकरेंचा आवाज रेकॉर्ड करतानाचा व्हिडीओ झी टॉकीजच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये राज ठाकरे चित्रपटासाठी आवाज रेकॉर्ड करताना दिसत आहेत. “सह्याद्रीच्या नजरेतून आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्या बुलंद आवाजातून सादर होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या महापराक्रमाची गाथा ‘हर हर महादेव’”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
हेही वाचा >> Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत
हेही वाचा >> “फटाके विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने…”, अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी’मध्ये केला खुलासा
‘हर हर महादेव’ चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता शरद केळकरने शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री सायली संजीव महाराणी सईबाई भोसले आणि अमृता खानविलकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. याबरोबरच हार्दिक जोशी आणि नितिश चव्हाण या कलाकरांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा
मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २.२५ कोटींचा गल्ला जमवला. राज ठाकरेंनी चित्रपटाचं कौतुक करत ‘हर हर महादेव’ पाहिल्यानंतर डोळ्यांतून पाणी आल्याचं म्हटलं होतं.