आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसत आहे. या दर्जेदार चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक ट्वीट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वीच आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट पाहिला. यावेळी चित्रपटगृहातील एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत संपूर्ण चित्रपटगृह रिकामी असल्याचे दिसत आहे. याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : “२ तास वेळ काढून…” ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावची पोस्ट, म्हणाली “९० चा काळ…”

अमेय खोपकर यांचे ट्वीट

आत्मपॅम्फ्लेट हा मराठी चित्रपट आज बघितला. अतिशय उत्तम सिनेमा आहे, जो भरपूर हसवणूक करतो आणि तितकाच विचार करायलाही लावतो. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर देशभरातील सर्व प्रेक्षकांनी पहायला हवा असा झालेला आहे.

दुर्दैवाने, आज जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा आम्ही फक्त पाचजण सिनेमाहॉलमध्ये होतो. मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? एका उत्कृष्ट कलाकृतीला प्रेक्षक मिळतील नसतील तर नेमकं काय चुकतंय आणि हे असं का होतंय, याचा आता निर्माते आणि प्रेक्षक, सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. भविष्यात यासाठी पुढाकार घेऊन जे जे करावं लागेल ते आम्ही करणारच… पण सध्यातरी माझं सर्वांना आवाहन आहे की आत्मपॅम्फ्लेट हा चित्रपट आवर्जून बघा. असे चांगले चित्रपट मराठीत फार कमी बनतात, जर आत्ता त्यांना आपण प्रतिसाद दिला नाही तर दिवसेंदिवस मराठीची अवस्था आणखी बिकट होत जाईल, असे अमेय खोपकर यांनी म्हटले.

आणखी वाचा : “तो वेडा आहेच, पण…” परेश मोकाशींच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली “आम्ही नवरा-बायको…”

दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसते. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader amey khopkar angry after watch aatmapamphlet movie share video nrp
First published on: 09-10-2023 at 09:19 IST