Ameya Khopkar : महाराष्ट्रात मराठी सिनेमांना स्क्रिन्स मिळत नाहीत हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलात चर्चेत आला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान, प्रथमेश परब, पुष्कर जोग यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये मराठी चित्रपट दाखवले जातात. पण, मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे, अनेक सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडू लागले आहेत.

देशभरात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक सिंगल स्क्रीन थिएटरच्या संख्येत गेल्या काही वर्षात लक्षणीय घट झालेली आहे. ही सिंगल स्क्रीन चित्रपटगृहं हळुहळू बंद होऊ लागली आहेत. याबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मराठी सिनेमाकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात…

Marathi Actor Meets Riteish Deshmukh
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
jackie shroff marathi movie
जॅकी श्रॉफ तब्बल १० वर्षांनी दिसणार मराठी सिनेमात, सोबतीला ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य?
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

“गेल्या काही वर्षात देशातील सिंगल स्क्रीन थिएटरची संख्या २०,००० ते ५५०० (मरणासन्न) इतकी घटलीये. पुण्यातील ३० पैकी ९ बंद. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील ४०० पैकी ५० थिएटर कायमची बंद पडलील, तर ५० बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उरलेल्या थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं (आतातरी). मी लवकरच तारीख जाहीर करेन.” अशी एक्स पोस्ट अमेय खोपकर यांनी शेअर केलेली आहे.

दरम्यान, मराठी चित्रपटांना स्क्रिन्स मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांत कलाविश्वातून अनेक मान्यवरांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळेच आता यावर एकत्र येऊन चर्चा करुन मार्ग काढण्याचं आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी महेश मांजरेकर, अभिजीत पानसे, संजय जाधव, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव यांनाही टॅग केलं आहे.

Story img Loader