शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे अनेक ठिकाणी शोज ठेवण्यात आले आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. पठाणच्या बरोबरीने इतर चित्रपटदेखील या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत. हिंदीप्रमाणे मराठी चित्रपटदेखील या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे त्यावर मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर हे कायमच विविध चित्रपटांबद्दल भाष्य करताना दिसतात. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच अमेय खोपकर यांनी जय महाराष्ट्र चॅनेलवर बोलताना मल्टिप्लेक्स मालकांना इशारा दिला आहे. ते असं म्हणाले,” पठाण हा हिंदी चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. ‘पठाण ‘या चित्रपटाला आमचा विरोध नाही. ‘पठाण’ शाहरुख खानचा कमबॅक आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा पण गेल्या ४ आठवड्यांपासून ‘वेड’ हा चित्रपट चांगला कमावत आहे. त्यानंतर ‘वाळवी’ आला आता ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ हे चित्रपट आणि इतर मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.”
ते पुढे म्हणाले, “मल्टिप्लेक्समध्ये किंवा सिंगल स्क्रीन असलेल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना शोज मिळत नाहीयेत, मी याचा निषेध करतो. मी मल्टिप्लेक्सवाल्यांना इशारा देतोय जर मराठी चित्रपटांना चांगल्या स्क्रीन्स दिल्या नाहीत तर महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि आम्ही बघून घेऊ कसे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत.” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
शाहरुख खानच्या ‘पठाण’वर केआरकेचे ‘ते’ ट्वीट; नेटकऱ्यांनी केलं
नुकताच ‘वाळवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबरीने तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला ‘बांबू’ चित्रपट २६ जानेवारी रोजा प्रदर्शित होत आहे.