झी स्टुडिओज निर्मित व अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा टीझर व ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “…तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सर्व चित्रपटात व्हॉईस ओव्हर द्यायला लावला”, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

या चित्रपटामध्ये अभिनेता शरद केळकरने बाजीप्रभु देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. सुबोध भावेने घेतलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी शरद केळकरच्या आवाजाचं तोंडभरून कौतुक केलं. राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाला आवाज दिला आहे. चित्रपटासाठी व्हॉईस ओव्हर देतानाचा अनुभव कसा होता? याबाबतही राज ठाकरे यांनी सांगितलं.

मित्र अजित भोरे यांनी राज ठाकरे यांना व्हॉईस ओव्हर कसा असला पाहिजे याबाबत सगळं काही शिकवलं. याबाबत त्यांनी स्वतःच या मुलाखतीमध्ये खुलासा केला. त्याचबरोबरीने शरद केळकरच्या नावाच त्यांनी उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले, “शरद केळकर यांचं व्हॉईस ओव्हरमध्ये प्रचंड काम आहे. ‘बाहुबली’चा आवाजही तेच आहेत. त्याच्यामुळे या चित्रपटासाठी व्हॉईस ओव्हर देणं माझ्यासाठी काही सोपी गोष्ट नव्हती.”

आणखी वाचा – नातवाला छत्रपती शिवाजी महाराजांची कोणती गोष्ट सांगणार? सुबोध भावेच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणतात…

पुढे ते म्हणाले, “खरं तर मी अभिजीत देशपांडे यांना सांगितलं होतं की, तुम्ही माझा आवाज या चित्रपटासाठी असावा असं बोलत आहात पण सगळ्यात बुलंद आवाज हा शरद केळकर यांचा आहे. तो मराठीमधला जबरदस्त मोठा आवाज आहे.” अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी शरद केळकरचं कौतुक केलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj raj thackeray talk about actor sharad kelkar har har mahadev subodh bhave movie see details kmd