रितेश देशमुख व जिनिलीया ही मनोरंजन विश्वातील लाडकी जोडी आहे. ‘वेड’ या मराठी चित्रपटातून ते दोघेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहेत. तर जिनिलीयाने ‘वेड’मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनाही भूरळ घातली आहे. नुकतंच रितेश-जिनिलीयाने प्लाझा चित्रपटगृहात ‘वेड’ चित्रपटाच्या शोदरम्यान हजेरी लावली. यावेळी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. रितेश-जिनिलीया व शर्मिला ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शर्मिला यांनी जिनिलीयाबाबत केलेलं विधान चर्चेत आहे.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”

हेही वाचा>> …म्हणून राज ठाकरेंच्या पत्नीने ‘वेड’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच केलं बुक

शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “देशमुख कुटुंबीय व आमचे जवळचे संबंध आहेत. अनेकदा आमच्या भेटीगाठी होत असतात. गेली अनेक वर्ष मी जिनिलीयाला पुन्हा पडद्यावर येण्याबाबत बोलत आहे. मी रितेशशीही याबाबत अनेकदा बोलले होते. त्यांच्या लग्नाला आता दहा वर्षे झाली. जिनिलीया दोन मुलांची आई आहे. पण तिच्या चेहऱ्यावरुन असं वाटतच नाही की तिला एवढी मोठी मुलं आहेत”.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच प्रसाद जवादे-अमृता देशमुखचं डेटिंग, पोस्ट शेअर करत म्हणाले…

“जिनिलीया उत्तम अभिनेत्री आहे. ‘लय भारी’ चित्रपटात ती फक्त एका गाण्यासाठी पाहुणे कलाकार म्हणून दिसली होती. परंतु, त्याचीही दखल घेण्यास तिने भाग पाडलं. तिच्या स्माइलचे लाखो चाहते आहेत. म्हणून पुन्हा पडद्यावर येण्यासाठी मी दोघांच्याही मागे लागले होते. ‘वेड’मुळे जिनिलीया पुन्हा पडद्यावर दिसली. याचा आनंद मलाही आहे”, असंही पुढे त्या म्हणाल्या.

हेही वाचा>> राहुल गांधींच्या विधानानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट, म्हणाला “त्यांना घरी घेऊन जा आणि…”

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने कोटींची कमाई करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला आहे.

Story img Loader