अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप होत आहे. राज्यात ठिकठिकाणी चित्रपटाचे शो बंद पाडण्यात येत आहेत. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण करत हा शो बंद पाडला. यावर आता आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “प्रेक्षकांना कुठल्याही प्रकारे मारहाण करण्यात आलेली नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला संभाजीराजे छत्रपती यांनीही विरोध केलेला आहे. ज्या कुटुंबांबद्दल चित्रपटात उल्लेख आहेत, त्यांनीही चुकीचा इतिहास दाखवला असल्याचं म्हटलं आहे. इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचं कारण काय? मला वाटतं यामागे काहीतरी अजेंडा असू शकतो. छत्रपती शिवाजीमहाराज आणि इतर थोर व्यक्तींच्या बाबतीत असा अजेंडा होत असेल, तर त्याचा निषेध सगळ्यांनीच केला पाहिजे”.

हेही वाचा >> “ऐतिहासिक संदर्भांचे पुरावे सेन्सॉर बोर्डकडे…”, ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंची स्पष्ट भूमिका

रोहित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही टीका केली. “मनसेने पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजीमहाराजांचा चुकीचा इतिहास सांगणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला होता. या चित्रपटाच्या मागे उभं न राहता, ती चूक सुधारण्याची मनसेला संधी आहे. हे मला मनसेला सांगायचं आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा विरोध तुम्ही का करत नाही, अशी शंका सामान्य माणसांना येत आहे”, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील उत्कर्षच्या लूकचे पोस्टर शेअर करत आदर्श शिंदे म्हणाला, “तू दिवस-रात्र…”

‘हर हर महादेव’ चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील बलिदानाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या भूमिकेत असून शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. मराठीसह तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns vs ncp rohit pawar commented on har har mahadev movie raj thackeray kak
Show comments