सखी गोखले आणि शुभांगी गोखले ही आई-लेकीची जोडी नेहमीच चर्चेत असते. शुभांगी गोखले या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयकौशल्याद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आल्या आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत सखीनंदेखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सखीचे वडील दिवंगत अभिनेते मोहन गोखले ती लहान असतानाच त्यांना सोडून गेले. तेव्हापासून सखीला आई आणि वडील अशा दोहोंचंही प्रेम शुभांगी गोखलेंनीच दिलं.

मातृत्व दिनानिमित्त सखी आणि शुभांगी यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान सखीनं तिच्या वडिलांच्या सहवासाबद्दल भाष्य केलं. सखी म्हणाली, “मी खूप नशिबवान आहे की, मी खूप लहान असतानाच बाबा गेला म्हणजे हे ऐकायला खूप क्रूर वाटेल. पण, मी इतकी लहान होते की, माझ्याकडे त्याच्या अशा खूप आठवणीच नाही आहेत. बाबा गेला तेव्हा मी सहा वर्षांची होते. तेव्हा तो कामात खूप व्यग्र होता आणि त्या वेळेस आईच माझ्याजवळ असायची. तेव्हापासूून मला आईचीच सवय होती.”

Nana Kate, Ajit Pawar, Nana Kate withdrew election,
चिंचवडमधून अजित दादांच्या शिलेदाराचे बंड शमले; नाना काटेंची निवडणुकीतून माघार
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
After threat to UP CM Yogi Adityanath Mumbai Police received another threat message
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Lakhat Ek Aamcha Dada
अखेर तो क्षण आला, तुळजाला झाली प्रेमात पडल्याची जाणीव; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नवीन वळण
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
abhishek bachchan express opinion with living family
अभिषेक बच्चनने लग्नानंतरही पालकांबरोबर राहण्याविषयी मांडले होते मत; म्हणाला, “माझ्या आईचा एक नियम…”

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो

पुढे सखी म्हणाली, “वडील नसणं हे अवघड अशा लोकांसाठी आहे; जे थोड्या मोठ्या वयात आपल्या आई-वडिलांना गमावतात. ते खूप अवघड असतं. कारण- इतकी वर्ष तुमचं एक नातं निर्माण झालेलं असतं आणि आई-वडिलांना गमावणं ही खूप मोठी गोष्ट असते. मला त्या बाबतीत असं वाटतं की, मी भाग्यवान आहे. अशा काळात तो गेला, जेव्हा मला काहीच माहीत नव्हतं.”

त्यानंतर शुभांगी गोखले म्हणाल्या, “पण मला कधी कधी सखीसाठी वाईट वाटतं. कारण- मुलं बाबांबरोबर वेगळ्या गोष्टींवर बोलू शकतात. क्रिकेटच्या गोष्टी, राजकारण वगैरे वगैरे. मोहनला प्रवास खूप आवडायचा. मोहनच्या नजरेतून तिला जग बघायला मिळायला हवं होतं.”

सखी काही प्रमाणात तिच्या वडिलांसारखीच आहे. याबाबत सांगताना सखी म्हणाली, “आम्ही दोघं बऱ्यापैकी सारखेच आहोत. आमच्या घरी एक मोठं बुकशेल्फ आहे. तिथे आई-बाबांची अनेक पुस्तकं आहेत. बाबांची इंग्रजी पुस्तकं जास्त आहेत. तर मला जेव्हा काही वाचायचं असतं तेव्हा नेहमीच त्यांची अजूनही नवनवीन पुस्तकं सापडतात तिथे. मी अगदी काही दिवसांपूर्वी विचार करीत होते की, मला हे वाचायचंय आणि ते पुस्तक मला बाबांच्या बुकशेल्फमध्ये सापडलं”

हेही वाचा… बालपणीच्या गौरव मोरेला पाहिलंत का? फिल्टरपाड्याच्या बच्चनने शेअर केला शाळेतला फोटो, म्हणाला…

“मी आईला म्हणते की, आता जर बाबा असता, तर जास्त मजा आली असती. कारण- आता मी ज्या टप्प्यावर आहे, तिथे मला बाबांची उणीव भासते. माझ्या म्युझिकच्या आवडी किंवा माझ्या वाचनाच्या आवडी, मी जे बघते, मला जे आवडतं किंवा मला ज्या गप्पा मारायला आवडतात, त्या सगळ्यामध्ये तो आता असता, तर नक्कीच मजा आली असती,” असंही सखी म्हणाली.

दरम्यान, शुभांगी गोखले सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. तर, सखी गोखले शेवटची ‘दिल दिमाग और बत्ती’ या चित्रपटात झळकली होती.