आपल्या देशात १ कोटी ८० लाख बेघर ज्येष्ठ नागरिक आहेत. काही वेळा मुलं त्यांच्या वयोवृद्ध झालेल्या आई-वडिलांना सीएसएमटीसारख्या मोठया रेल्वे स्थानकावर घेऊन येतात, पाणी आणतो सांगतात आणि तिथेच सोडून निघून जातात. हे प्रमाण सध्या खूप वाढते आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मला या ज्येष्ठ नागरिकांची समस्या मांडतानाच त्यांच्याबद्दल सगळयांनीच सहानुभूतीने विचार करायला हवा, असा संदेश द्यायचा होता. म्हणूनच ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत असल्याची माहिती दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या ‘जुनं फर्निचर’ या आगामी चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात दिली.

‘सत्या – सई फिल्म्स’ आणि ‘स्कायिलक एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची घोषणा नुकतीच दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. त्याच वेळी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचा टीझर प्रसिद्ध चित्रपट लेखक, निर्माते सलीम खान यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या वेळी आमदार आशीष शेलार, सदा सरवणकर यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक- अभिनेते महेश मांजरेकर, अमेय खोपकर आणि कलाकार उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर उपस्थित होते. यतिन जाधव निर्मित, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही महेश मांजरेकर यांचे आहेत. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटामध्ये ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या मुद्दयांवर भाष्य करण्यात येणार आहे.

zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल
Ghateshwar Shiv Temple shindewadi
पुण्यापासून फक्त ५० किमीवर आहे सुंदर तलावाच्या काठी हे शिवमंदिर, VIDEO एकदा पाहाच
Kolhapurs short film Deshkari highlighting farmers and soldiers won Filmfare OTT and Jury Awards
कोल्हापुरातील देशकरी लघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार

हेही वाचा >>> मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर ‘या’ अभिनेत्रीला म्हणायचे नाकातला केस, स्वतः किस्सा सांगत म्हणाल्या…

हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेण्डिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा ‘ओल्ड फर्निचर’ म्हणजेच ‘जुनं फर्निचर’ हा शब्द. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली ‘जुनं फर्निचर’ म्हणण्याची पद्धत आहे, परंतु हेच जुनं फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. हा चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडताना ‘जुनं फर्निचर’ म्हणून संबोधलं जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन नक्की बदलेल, असा विश्वासही महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला.

बीईंग ह्युमनची गंमत..

अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची हिंदीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक असलेल्या अभिनेता सलमान खानशी घट्ट मैत्री आहे. ‘जुनं फर्निचर’च्या टीझर प्रदर्शन सोहळयाला उपस्थित राहिलेल्या सलीम खान यांचं कौतुक करतानाच सलमानच्या ‘बीईंग ह्युमन’ या मोठया ब्रॅण्डचं गुपित सांगितलं. ‘बीईंग ह्युमन’ हा ब्रॅण्ड सलमान चालवतो असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात हा उपक्रम सलीम खान यांच्या पुढाकाराने सुरू झाला. आजपर्यंत या ‘बीईंग ह्युमन’च्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना केलेली मदत खूप थक्क करणारी आहे, अशा शब्दांत मांजरेकर यांनी सलीम खान यांचे कौतुक केले.

Story img Loader