हिंदूवी स्वराज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांना मोलाची साथ लाभली ती म्हणजे निधडय़ा छातीने लढणाऱ्या शिलेदारांची. ज्यांना फक्त एकच गोष्ट ठाऊक होती ती म्हणजे आपण ‘फकस्त लढायचं, आपल्या राजासाठी अन स्वराज्यासाठी..’ इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने तर कधी कधी अनेक षडय़ंत्राने भरलेला असतो. इतिहासाच्या पानात लपलेल्या अशा अनेक शूरवीरांपैकी एक असलेल्या रावजीची आणि त्याच्या प्रेमाची कथा उलगडणारा ‘रावरंभा’ चित्रपट १२ मेला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा चित्रपट रसिकांसाठी वेगळा रोमहर्षक अनुभव ठरणार आहे. काही मावळय़ांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ ही सह्याद्रीच्या कडेकपारीतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही नुसतीच प्रेमकथा नाही, तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि स्वराज्याच्या प्रति असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला असल्याचे दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात. ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे. ‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie ravrambha releasing across the state on 12 may zws
Show comments