Mrinal Kulkarni Mother Veena Dev Passed Away : सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं अल्पशा आजाराने मंगळवारी ( २९ ऑक्टोबर ) निधन झालं आहे. त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव यांनी जगाचा निरोप घेतल्यावर सध्या संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

वीणा देव पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट शेअर केली आहे.

pune Senior Marathi writer Dr Veena Dev passed away on Tuesday
ज्येष्ठ लेखिका प्रा. वीणा देव यांचे निधन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Priya bapat sings kajra mohabbat wala 56 years old song
प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
neha gadre marathi actress announces pregnancy
इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल
shivani rangoli birthday mother in law mrinal Kulkarni writes special post
लाडक्या सुनेचा वाढदिवस! मृणाल कुलकर्णींची शिवानी रांगोळेसाठी खास पोस्ट; म्हणाल्या, “काहीतरी गंमत…”
siddharth chandekar family visited star pravah mi honar superstar show
सिद्धार्थ चांदेकरला मिळालं गोड Surprise! शोमध्ये आई अन् पत्नीची उपस्थिती; त्याचे सावत्र वडील म्हणाले, “आम्ही सगळे…”

हेही वाचा : ज्येष्ठ लेखिका प्रा. वीणा देव यांचे निधन

“खरंतर आता काही व्यक्त होण्याची ताकद नाही. आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या, वेळी-अवेळी एका फोनवर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मधुरा आणि मी तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो. आईला फुलांची प्रचंड आवड. शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपाने तिची सोबत कायम असेल. आशीर्वाद असावा!” असं लिहित मृणाल कुलकर्णी यांनी आईच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

मृणाल कुलकर्णींच्या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त करत वीणा देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेते-कवी सौमित्र लिहितात, “मृणाल! काय लिहू..! एक मुलगी म्हणून त्यांच्यासाठी तू अभिमानास्पद होतीस…आहेस. तुम्ही दोघींनी त्यांच्यासाठी जे जे आवश्यक आणि शक्य होतं ते ते केलंत…त्यांचा पुढला प्रवास सुंदर होवो हीच सदिच्छा..”

हेही वाचा : धर्मेंद्र यांनी ‘या’ कारणामुळे दिला होता हेमा मालिनी यांच्याबरोबर काम करण्यास नकार, खुद्द ड्रीम गर्लनेच केला खुलासा…

दरम्यान, पती डॉ. विजय देव, त्यांच्या दोन मुली मृणाल आणि मधुरा आणि जावई रुचिर कुलकर्णी ( मृणाल कुलकर्णींचे पती ) यांच्यासमवेत वीणा देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग केले. याशिवाय मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्या दुर्मिळ साहित्यकृती देखील प्रकाशित केल्या होत्या.

Story img Loader