‘माझा होशील ना’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे विराजस कुलकर्णी. त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या दिग्दर्शन कौशल्याचंही प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. आज विराजस कुलकर्णीचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्याची आई अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या लेकासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. फक्त पोस्टमधून त्यांनी फक्त शुभेच्छा दिल्या नाहीत तर त्यांनी या पोस्टमधून विराजसला एक खास सल्लाही दिला आहे.

मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, त्यांना आवडलेले लेख, कविता, किस्से चाहत्यांशी शेअर करत असतात. आज विराजसच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा : आठ वर्षांनी मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा दिग्दर्शिकेच्या भूमिकेत, महिला विशेष चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

विराजसचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “प्रिय विराजस ,आमचा शहाणा मुलगा तर तू आहेसच,पण आता लग्नानंतर “बॅलन्सिंग ऍक्ट” पण तू मस्त पार पाडतो आहेस. यावर्षी तुझा पहिला सिनेमा रिलीज झाला, त्याला यश मिळाले , सर्व थरातील लोकांनी त्याची नोंद घेतली, याचा खूप अभिमान वाटतो. तू येणाऱ्या वर्षी जे जे प्लॅन केलं आहेस ते सर्व उत्तम रीतीने पार पडो आणि त्यात तुला भरघोस यश मिळो. शिवानी आणि तुला खूप प्रेम …Happy Birthday!!! PS : आता तरी थोडासा केक खायला लाग ! आई – बाबा.”

हेही वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे. ह्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विराजसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी मृणाल यांनी लिहिलेल्या या पोस्टचं कौतुकही केलं. आता ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

Story img Loader