मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बहिण गौतमी देशपांडेबरोबरचे मजेशीर व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. चाहत्यांचं सतत मनोरंजन करणारी ही अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. निसर्गाच्या सानिध्यात छोटसं घर बांधलं असल्याचं मृण्मयीने मध्यंतरी एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. मृण्मयी सध्या पतीसह महाबळेश्वरमध्ये राहत आहे.

आणखी वाचा – Video : मध्यरात्री एकमेकांना भेटले अरबाज खान व मलायका अरोरा, दोघांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मृण्मयीने हिरव्या गार निसर्गाच्या कुशीत जागा खरेदी करत स्वतःचं एक घर असावं असं स्वप्न पाहिलं. हे नवं घर तिने महाबळेश्वरमध्येच बांधलं आहे. तर मृण्मयी सध्या महाबळेश्वरमध्ये कुटुंबाबरोबर एकत्रित वेळ घालवत आहे. सोशल मीडियाद्वारे घरातील एक फोटो शेअर करत मृण्मयीने एक किस्सा सांगितला.

घरात उंदीर आल्यानंतर मृण्मयीची एकच तारांबळ उडाली असल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. उंदीर घरात येताच मृण्मयी त्याला बाहेर काढण्यासाठी खटाटोप करते. “उंदराला सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठीचा मार्ग. तो इकडे तिकडे भटकू नये म्हणून सैनिक तैनात. असं आहे महाबळेश्वरचं आयुष्य.”

आणखी वाचा – सोनम कपूरने कोट्यवधी रुपयांना विकलं मुंबईतलं घर, किंमत आहे तब्बल…

मृण्मयीने महाबळेश्वरचं आयुष्य कसं आहे हे फोटो पोस्ट करत सांगितलं आहे. ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे निसर्गाच्या सानिध्यातील इतरही फोटो शेअर करताना दिसते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची बरीच पसंती मिळते. सध्यातरी कोणतंही काम हाती न घेता मृण्मयी तिचं आयुष्य एण्जॉय करताना दिसत आहे.

Story img Loader