अभिनेत्री मृणाल ठाकूर आज बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. मृणालने बॉलीवूडसह, दाक्षिणात्य सिनेमांत काम केले आहे. मृणालने विविध भाषेतील सिनेमांत काम केले असले तरी ती मराठमोळेपण नेहमी जपते. अनेकदा ती मराठीत रील आणि मजेशीर व्हिडीओ तयार करून त्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करते. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना मराठीत उत्तर देणारी मृणाल अनेक मराठी कलाकृती आणि मराठी अभिनेत्यांचे कौतुक करत असते. नुकतेच मृणालने आदिनाथ कोठारेच्या सिनेमाचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी आदिनाथ कोठारेचा ‘पाणी’ हा सिनेमा आला होता. आदिनाथ कोठारेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मराठावाड्यातील नागदरवाडी गावात असणारी पाणीटंचाई घालवण्यासाठी काम करणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्यावर हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. या सिनेमात आदिनाथ कोठारेने हनुमंत केंद्रे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा…“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…

मृणालने नुकताच हा सिनेमा पाहिला असून तिने आदिनाथ कोठारेसह या सिनेमातील ऋचा वैद्य, सुबोध भावे यांसह संपूर्ण टीमचे कौतूक केले आहे, मृणाल इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाली, “आदिनाथ तू पाणी सिनेमात खूप छान काम केलं आहेस, एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून तू उत्तम काम केलं आहेस. राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही खरंच पात्र आहात, प्रियांका चोप्रा, तुझी कथा सांगण्याची आवड, समाजावर चांगला परिणाम करतील अशा सिनेमांची निर्मिती करण्यासाठी मला तुझं नेहमीच कौतुक वाटतं. ऋचा वैद्य, सुबोध भावे आणि संपूर्ण ‘पाणी’ चित्रपटाच्या टीमचं हार्दिक अभिनंदन!” मृणालने पाणी चित्रपटाच्या टीमचं कौतुक करतानाच हा चित्रपट प्रेक्षकांनी ओटीटी माध्यमावर नक्की पाहावा असे आवाहन केले आहे.

नुकतेच मृणालने आदिनाथ कोठारेच्या सिनेमाचे कौतुक केले आहे. (Mrunal Thakur Instagram)

हेही वाचा…Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

आदिनाथ कोठारेने मृणाल ठाकूरची स्टोरी रिपोस्ट करत तिचे “धन्यवाद” म्हणत तिचे आभार मानले आहे. अभिनेत्री ऋचा वैद्यनेही मृणालची स्टोरी रिपोस्ट करत तिचे आभार मानले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरच ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये दिसणार असून यात तिच्यासह अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunal thakur praises adinath kothare national award winning film paani psg