अभिनेत्री, गायिका, नृत्यांगणा अशा विविध कलेत पारंगत असलेली मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे. मालिका, सिनेमा, नाटक अशा तिन्ही माध्यमांमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने प्रेक्षकांच मन जिंकलं. नुकताच मृण्मयीचा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी मृण्मयीने अनेक ठिकाणी भेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मृण्मयीला तिच्या पहिल्या मानधनाबद्दल विचारलं असता मृण्मयी म्हणाली, “इंडस्ट्रीमधलं पहिलं मानधन ‘अग्निहोत्र’साठी दीड हजार रुपये होतं. पण कॉलेजमध्ये असताना पहिल्याच वर्षी मी प्रत्येक शनिवार रविवार अदमदनगरला डान्स क्लास घ्यायला जायचे. माझ्या गुरूंनी मनिषा ताईंनी तिकडे एक ब्रांच सुरू केली होती. मी सलग दोन-तीन वर्ष तिकडे शिकवलंय. तर माझा महिन्याचा पहिला पगार होता पाच हजार रुपये. तेव्हा जास्त खर्च नसायचा फक्त प्रवासाचा खर्च असायचा. मी लाल परीमधूनच जायचे यायचे, असाच माझा शनिवार रविवार तीन वर्षांचा दिनक्रम होता. ‘अग्निहोत्र’ सुरू झाल्यानंतरसुद्धा काही दिवस मी हे केलं. मग झेपण्याचा पलीकडे गेलं होतं.”

हेही वाचा… “आता शोभतोयस खरा फिल्टरपाड्याचा बच्चन”, गौरव मोरेचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले…

मृण्मयी पुढे म्हणाली, “मला आठवतंय तेव्हा आमच्याकडे बाबांची मारुती ८०० होती आणि खूप काहीतरी वर्ष झाली होती त्यांची म्यूझिक सिस्टीम बिघडली होती ती त्यांना बदलायची होती आणि तेव्हा ती साडे सात/ आठ हजाराची ती सिस्टीम होती. एकदा मी आई आणि खरेदीला बाहेर गेलो होतो तर जाता जाता सहज मी डेक्कनला एक दुकान होतं तिकडे आम्ही गेलो आणि आईला मी म्हटलं बाबांना ते हवं होतं ना. आम्ही त्याची किंमत विचारली. सात/ आठ हजार रुपये काहीतरी किंमत होती त्याची. तर मी आईला म्हटलं चल मग घेऊन टाकुया आता. तर आईने मला विचारलं घ्यायचं मी म्हटलं हो.”

मृण्मयी म्हणाली, “मी पैसे दिले. आईने ते घेतलं आणि आई म्हणाली, मृण्मयी मी आयुष्यात एवढी मोठी रक्कम अशी एकरकमी खर्च केली आहे. ही १८ वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तर अशा आठवणी तेव्हा पैसे पुरायचे.”

हेही वाचा… संस्कृती बालगुडेने चित्रपटगृहात मोठ्या आवाजात राष्ट्रगीत गायलं; अभिनेत्री म्हणाली, “मला अशा लोकांविषयी शून्य आदर…”

दरम्यान, मृण्मयीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मृण्मयी देशपांडेने ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमात सुधीर फडके यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका साकारली आहे. ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची निर्मिती सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी केली आहे. मृण्मयी देशपांडेसह सुनील बर्वे , सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrunmayee deshpande gave gift to her father from first salary dvr