मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर मृण्मयीने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर मृण्मयी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मृण्मयी पतीसह महाबळेश्वरमध्ये स्थायिक झाली आहे. मध्यंतरी एक पोस्ट शेअर करत निसर्गाच्या सानिध्यात छोटसं घर बांधलं असल्याचं मृण्मयीने सांगितलं होतं.

महाबळेश्वरमध्ये मृण्मयी व तिचा पती स्वपनील शेती करतात. महाबळेश्वरमध्ये मृण्मयी-स्वप्नीलने ‘नील अँड मोमो’ फार्म्स हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात तिने वांगी, भेंडी. मिरची, कोथिंबीर सारख्या भाज्यांची लागवड केली आहे, मृण्मयी अनेकदा व्हिडीओद्वारे शेतीविषयक काही माहिती देताना दिसते. आता मृण्मयीने शेतात स्ट्रॉबेरीचे पिक घेतले आहे. मृण्मयीने याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

व्हिडीओच्या सुरुवातीला मृण्मयी “एक फारच भारी काम करायला मी आत्ता तयार आहे ते म्हणजे आमच्या शेतातून स्ट्रॉबेरीची काढणी करणे. कारण स्ट्रॉबेरी आता रेडी आहे आणि आम्ही त्यांना खायला हापापले आहोत” असे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर मृण्मयी व तिचा पती स्वप्निलने स्ट्रॉबेरीची काढणीही केली. स्टॉबेरी तोडताना मृण्मयी खूपच उत्साही दिसत आहे. मृण्मयीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा- सुकन्या मोनेंनी लेकीसाठी घेतला होता इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय; म्हणाल्या, “पाळणाघरात किंवा नॅनीच्या जीवावर…”

मृण्मयी व स्वप्निलने मध्यंतरी महाबळेश्वरमध्ये शेतीविषयक कोर्स सुरु केला होता. तसेच मृण्मयीने स्वतःचा एक नैसर्गिक ब्युटी ब्रँडही सुरु केला आहे. महाबळेश्वरमधूनच ती या संपूर्ण ब्रँडचे काम पाहते. मृण्मयी सध्या निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचा वेळ घालवताना दिसत आहे.

Story img Loader