ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा मृतदेह १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील फ्लॅटमध्ये आढळला. ते तिथे सात-आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते. तर, त्यांचा मुलगा गश्मीर आई माधवी, पत्नी गौरी व मुलाबरोबर मुंबईला राहतो. रवींद्र यांच्या निधनाची माहिती पोलिसांनी गश्मीरला दिली होती.
कोण आहे रवींद्र महाजनींची मुलगी? गश्मीरने शेअर केलेले बहिणीचे फोटो पाहिलेत का?
रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अनेकांनी गश्मीरला ट्रोल केलं. वडील तीन दिवसांपासून मृत घरात पडून होते आणि मुलाला माहीतच नाही, अशा प्रकारच्या कमेंट्स करून गश्मीरवर टीका केली गेली. या घटनेच्या चार दिवसांनी गश्मीरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं.
हेही वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब
“अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो. आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. मी याबद्दल भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर नक्कीच बोलेनच”, अशी पोस्ट गश्मीर महाजनीने केली होती. त्याची ही पोस्ट मराठी अभिनेत्रीने रिपोस्ट केली आहे.
मृण्मयी देशपांडेने गश्मीरची स्टोरी रिपोस्ट करत “आम्ही तुझ्यासोबत आहोत”, असं म्हटलं आहे.
दरम्यान, रवींद्र महाजनी माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो, असं म्हणत गश्मीरने ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली होती.