मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखलं जातं. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या मुक्ता ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त ती परदेशात असूनही सातत्याने चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपट १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. परेश मोकाशींच्या ‘नाच गं घुमा’ने एकूण २.१३ कोटींचा गल्ला जमावला आहे. त्यामुळे सध्या सगळ्याच कलाकारांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुक्ता बर्वे परदेशात या चित्रपटाच्या लोकप्रिय गाण्यांवर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : ‘कन्यादान’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! समोर आला पहिला फोटो, लग्नाला मराठी कलाकारांची मांदियाळी

सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त मुक्ता बर्वे न्यूयॉर्कला असल्याने तिने ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’जवळ मराठमोळ्या अंदाजात ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील भातुकली गीतावर जबरदस्त डान्स केला आहे. यावेळी मुक्ताच्या जोडीला प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समज्ञाने देखील डान्स केल्याचं पाहायला मिळालं. या दोघींचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : प्राजक्ता माळीचं ‘नाच गं घुमा’ चित्रपटाशी आहे खास कनेक्शन! पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली, “माझी पहिली पार्टनरशिप…”

“टाइम्स स्क्वेअरची घुमा…सिनेमा पाहिला का? आता या भातुकली गीतावर तुम्ही सुद्धा डान्स करा” असं कॅप्शन देस समाज्ञाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भातुकली गीतावर डान्स करताना मुक्ताने साडी नेसली होती. गुलाबी रंगाच्या सुंदर साडीत अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.

हेही वाचा : Video : गौरव मोरेने घेतली अलका कुबल व भरत जाधव यांची भेट! पाहताक्षणी दोघांच्या पाया पडला अन्…, सर्वत्र होतंय कौतुक

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’जवळ मुक्ता बर्वेचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

मुक्ताच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून नेटकरी तिची एनर्जी पाहून थक्क झाले आहे. मुक्ताच्या चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये मुक्तासह नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे व बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader