चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिका साकारत मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावत मुक्तानं तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार केला आहे. अभ्यासू, मेहनती, प्रामाणिक असे एक ना अनेक गुण बाळगत या मनोरंजनसृष्टीत मुक्तानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच मुक्ताला एकेकाळी मुंबईत राहण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.

अभिनेत्री मुक्ता बर्वेनं नुकतीच ‘राजश्री मराठी’च्या ‘तिची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी चिंचवड-पुणे आणि मग मुंबईचा प्रवास सुरू झाला. यावेळी मुंबईत स्थिरावताना किती संकटं आली याबद्दल सांगताना मुक्ता म्हणाली, “मुंबईत मी मधुगंधामुळे आले. आजच्यापेक्षा २१-२२ वर्षांपूर्वी पुणे-मुंबई शहरं म्हणून थोडी लांब होती. पुणे शांत शहर आहे; पण मुंबईतली गर्दी, वेग पुण्यात नाही. मुंबईच्या हॉस्टेलमध्ये जागा मिळाली म्हणून मधूचा मला फोन आला. ती मला म्हणाली , की मुक्ते काय करतेयस. मी म्हटलं परीक्षा संपतेय उद्या माझी. मग ती म्हणाली, उद्या संपतेय ना मग परवा ये. मी म्हटलं कुठे, काय? मुंबईत एका हॉस्टेलमध्ये जागा झालीय आणि मी माझ्या मॅडमना सांगितलंय की, माझ्या एका मैत्रिणीला जागा हवीय, असं तिने सांगितलं. हो मला हवीय हवीय. मग मी परीक्षा संपवून मुंबईला आले. कुर्ल्याला त्या हॉस्टेलमध्ये मी अ‍ॅडमिशन घेतलं.”

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!

हेही वाचा… जॅकलिन फर्नांडिसच्या ‘YIMMY YIMMY’ गाण्यावर सहकलाकारांसह थिरकल्या ऐश्वर्या नारकर; नेटकरी म्हणाले, “ताई तुम्हीच…”

“पण मुंबई एक अवघड शहर आहे. म्हणजे एकदा तुमचं झालं की सोप्पं आहे. पण माझा दिशांचा घोळ, ट्रेनची भीती ही होतीच. मी कुर्ला स्टेशनला पहिल्याच दिवशी ट्रेनमधून पडले होते. भीतीमुळे मी दाराच्या जवळ गेले. कुर्ल्याला उतरायला एवढी गर्दी होती. ट्रेन थांबायच्या सगळे आधी उतरतात ना. ज्या मागच्या बायकांना उतरायचं होतं, त्यांचा धक्का लागून मी पडले. पडले म्हणजे मी आडवीच होते. मग कोणीतरी मला उठवलं. माझ्या पाठीवर सॅक वगैरे होती आणि माझ्या मनात थोडी भीती बसली.पण हे घरी सांगायचं नाही हे मी ठरवलं. कारण- आपल्याला भीती वाटते हे सांगितलं, तर म्हणतील घरी ये. नको एवढं करू इथेच काहीतरी कर. पुण्यात हौशी नाटकं करं; पण आपल्याला करिअर करायचंय.” असं मुक्ता म्हणाली.

“तेव्हा मला खूप सपोर्ट होता. मला नाटक मिळायच्या आधी मी दादर स्टेशनला पुलावर जाऊन उभी राहायचे. मी तेव्हा भूमिकांचा, गर्दीचा अभ्यास करायचे. ही माणसं आहेत आणि या माणसांमधले आता आपण एक माणूस होणार आहोत. याचा अभ्यास मी दीड आठवडा करीत होते. उभ राहायचं, बघायचं, खाली जायचं लिंबू सरबत प्यायचं, परत यायचं, बघायचं, ट्रेन पकडायची उलट-सुलट जायचं.” असं मुक्ताने नमूद केलं.

हेही वाचा… “मी माझं नावच विसरले” मिताली मयेकरने सांगितला ‘तो’ किस्सा; सिद्धार्थ म्हणाला, “शंखपुष्पी प्यायचं बाळा…”

दरम्यान, मुक्ताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, मधुगंधा लिखित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या आगामी चित्रपटात मुक्ता झळकणार आहे. मुक्ता बर्वेसह नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने, सारंग साठ्ये, आशा ज्ञाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.