केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. बॉक्स ऑफिसवर बरेच रेकॉर्ड मोडत या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. आता ‘नाच गं घुमा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने ‘बाईपण भारी देवा’पेक्षा बक्कळ कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ काल, १ मेला प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सारंग साठे प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने-कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटाचा टीझर, ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटातील गाणी तर सुपरहिट झाली. त्यामुळे आता ‘नाच गं घुमा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे. कारण पहिल्याच दिवशी ‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा – Video: जेव्हा माधुरी दीक्षितला ‘आंटी’ म्हणून मारली हाक, अभिनेत्रीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

‘नाच गं घुमा’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१३ कोटींची कमाई करत विक्रम प्रस्थापित केला आहे. मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील पहिल्या दिवसाच्या व्यवसायाच्या बाबतीत चित्रपटाचा तिसरा क्रमांक लागला आहे. केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटींचा गल्ला जमवला होता. ‘बॉली मुव्ही रिव्ह्यू’च्या मते, प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘सैराट’. २०१६साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.६ कोटींची कमाई केली होती.

हेही वाचा – “भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून…”, प्रसाद ओकने सांगितला आयुष्यातला सगळ्यात अवघड प्रसंग, म्हणाला…

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी-मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे निर्माते आहेत. आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukta barve namrata sambherao nach ga ghuma movie first day collection pps