Myra Vaikul Baby Brother Naming Ceremony : बालकलाकार मायरा वायकुळने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवर मालिका, सोशल मीडिया रिल्स या माध्यमातून तिने सर्वाचं भरभरून मनोरंजन केलं आहे. मायरा वैयक्तिक आयुष्यात काही दिवसांपूर्वीच मोठी ताई झाली. अर्थात, मायराच्या घरी तिच्या लहान भावाचं आगमन झालं. याबाबत तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत तिला लहान भाऊ झाल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती.
आपल्या दोन्ही मुलांचे सोशल मीडिया अकाऊंट्स मायराचे ( Myra Vaikul ) आई-बाबा म्हणजेच श्वेता व गौरव वायकुळ हँडल करतात. मायरा तिच्या लाडक्या भावाचं नाव काय ठेवणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर वायकुळ कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या लेकाच्या बारशाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
हेही वाचा : मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
मायराच्या लाडक्या भावाचं बारसं राजेशाही थाटात पार पडलं आहे. बारशासाठी खास पारंपरिक व फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच बारशाला मायरा आणि तिच्या आईने twinning करत पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. मायराने ( Myra Vaikul ) आपल्या भावाचं नाव व्योम असं ठेवलंय. तसंच पोस्ट शेअर करत तिच्या पालकांनी या नावाचा अर्थही सांगितला आहे.
मायराच्या पालकांनी शेअर केली पोस्ट
आमच्या बाळाचं नाव काय ?
उंच अमर्याद आकाशातील सूर्याचे तेज मी,
वाऱ्याच्या सळसळ तृप्तीचा स्पर्श मी,
नितळ निर्मळ जल-जीवन मी,
अनंत-अथांग असे अवकाश मी,
पंचमहाभूतांनी परिपूर्ण असा मी…. कोण?
अहं ….
व्योम!
चाहत्यांनी व्योमच्या बारशाच्या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, मायराबद्दल ( Myra Vaikul ) सांगायचं झालं तर, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. यामध्ये मायराला प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. याशिवाय मायराने ‘नीरजा’ या हिंदी मालिकेत सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारलीये. तिच्या या दोन्ही मालिकांमधल्या भूमिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. याशिवाय मायराला अनेक पुरस्कार देखील मिळाले. तसेच यावर्षी मायराने ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण देखील केलं.