मराठी मालिकाविश्वात बोलबोला असलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मायराने लहान वयात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं. या मालिकेतील मायराने साकारलेली परी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर मायरा ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळाली. अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर मायरा झळकली. आता मायराची मोठ्या पडद्यावर एन्ट्री होतं आहे. ते पण मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशीसह.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हो. हे खरं आहे. बालकलाकार मायरा वायकुळचा पहिला वहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंदर्भातली माहिती मायराच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून देण्यात आली आहे.

हेही वाचा – २४ वर्षांची ‘मिस वर्ल्ड २०२४’ क्रिस्टिना पिस्कोव्हा कोण आहे? काय काम करते? जाणून घ्या…

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात मायरा झळकणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या मराठी कलाकारांनी मांदियाळी पाहायला मिळणार आहे. या लोकप्रिय कलाकारांसह मायरा दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी महिला दिनानिमित्ताने ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला. यामध्ये मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव हटके अंदाजात पाहायला मिळाल्या.

हेही वाचा – फ्लॉप चित्रपट, पतीवर छळाचे आरोप अन्…; ‘मिस वर्ल्ड’ झाल्यानंतर भारतीय सौंदर्यवतीचं करिअर ठरलं अपयशी, सध्या काय करते?

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाद्वारे अभिनेता स्वप्नील जोशी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. स्वप्नीलसह शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, तेजस देसाई व तृप्ती पाटील यांनी देखील या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. मे महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रदर्शनाची तारीख मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myra vaikul is now on the big screen play role in upcoming marathi movie naach ga ghuma pps