मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाचं सुंदर कथानक घराघरांतल्या प्रत्येक महिलेला भावलं. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. आतापर्यंत ‘नाच गं घुमा’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास १६ कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. मराठी बॉक्स ऑफिस गाजवल्यावर आता ‘नाच गं घुमा’ थेट परदेशवारीवर जाणार आहे. यासंदर्भातील खास पोस्ट निर्माता स्वप्नील जोशीने शेअर केली आहे.

‘नाच गं घुमा’ चित्रपटात मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या दोघींच्या अफलातून जुगलबंदीची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते. याशिवाय ‘नाच गं घुमा’ला एकूण ६ निर्माते लाभले आहेत. स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आणि तृप्ती पाटील यांनी एकत्र मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता संपूर्ण राज्यभरात कौतुकाची थाप मिळवल्यावर ‘नाच गं घुमा’ अमेरिकेत दाखवला जाणार आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार

हेही वाचा : “तुझ्यासारख्या दिग्गज, बलाढ्य अभिनेत्रीसमोर…”, मुक्ता बर्वेच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावने लिहिली सुंदर पोस्ट

‘नाच गं घुमा’च्या टीमने परदेशातील प्रेक्षकांसाठी या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचं आयोजन केलं आहे. अमेरिकेतील ऑस्टिन, डॅलस, SFO bay area, हॉस्टन, सीऐटल, लॉस एंजेल्स या शहरांमध्ये १८ ते १९ मे दरम्यान चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात येईल. याशिवाय जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जाणार दुबईला! परदेशात करणार LIVE सादरीकरण, जाणून घ्या…

“‘नाच गं घुमा’ चित्रपट थेट जाऊन पोहोचलाय अमेरिकेत!काय मग? आपल्या लाडक्या घुमांचं स्वागत दणक्यात करणार ना?” अशी पोस्ट शेअर करत स्वप्नीलने व्हिडीओमध्ये अमेरिकेतील कोणत्या चित्रपटगृहांमध्ये किती शो होणार याची माहिती दिली आहे. याशिवाय प्रेक्षकांना तिकीटं कुठे बूक करता येतील याबद्दल देखील अभिनेत्याने पोस्टमध्ये माहिती दिली आहे.

हेही वाचा : वीकेंडसाठी नेटफ्लिक्सवरील सर्वोत्तम ॲक्शन-थ्रिलर चित्रपट अन् वेब सीरिजची यादी; तुम्ही पाहिल्या आहेत का ‘या’ कलाकृती?

हेही वाचा : दुखापतग्रस्त हाताला प्लास्टर, सुंदर ड्रेस अन्…; Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली ऐश्वर्या राय बच्चन, ग्लॅमरस अंदाज चर्चेत

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटविषयी सांगायचं झालं तर, यामध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्यासह सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader