मराठी कलाविश्वात सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली आहे. या चित्रपटाचं कथानक घराची मालकीण आणि तिला कामात मदत करणाऱ्या मदतनीस बाई यांच्यावर आधारित आहे. प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांची अनोखी जुगलबंदी, चित्रपटाचं कथानक, इतर सहकलाकारांचा अभिनय सगळ्याच गोष्टी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आणि प्रेक्षकांनी ‘नाच गं घुमा’वर अगदी पहिल्या दिवसापासूनच कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली होती.

अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक करण्यासाठी पोस्ट देखील शेअर केल्या होत्या. परंतु, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटामधील मुख्य अभिनेत्री अर्थात मुक्ता बर्वे नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेला होती. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असताना आपण दूर आहोत याबद्दल तिने खास पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. पण, आता १ महिन्याच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मुक्ता भारतात परतली आहे.

हेही वाचा : ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार नवीन मालिका! तब्बल ९ वर्षांनी शिवानी सुर्वेचं पुनरागमन, तारीख अन् वेळ केली जाहीर

नम्रता संभेराव, मधुगंधा कुलकर्णी आणि ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची संपूर्ण टीम तिचं स्वागत करण्यासाठी खास विमानतळावर पोहोचली होती. मुक्तासाठी या दोन्ही मैत्रिणी खास बॅनर धरून उभ्या होत्या. नम्रता आणि मधुगंधाला समोर पाहताच मुक्ता एकदम भारावून गेली. तिने पळत येऊन या दोघींना मिठी मारली व आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : Video : ‘मेरा पिया घर आया…’, नवऱ्याला सेटवर आलेलं पाहून माधुरी दीक्षित भारावली! रोमँटिक गाण्यावर केला जबरदस्त डान्स

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला सर्वत्र यश मिळत असताना मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतात परतल्यावर मुक्ता काहीशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नम्रता आणि मधुगंधाला जवळ घेत तिने या गोड सरप्राईजसाठी दोघींचे आभार मानले. एवढंच नव्हे तर ‘नाच गं घुमा’च्या शीर्षक गीताची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. त्यामुळे या तिघींनी मिळून विमानतळावरच ‘नाच गं घुमा’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत आनंद व्यक्त केला.

हेही वाचा : ‘तू भेटशी नव्याने’ : सुबोध भावेची नवीन मालिका! शिवानी सोनारसह साकारणार प्रमुख भूमिका, जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

नेटकरी सुद्धा या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, ‘नाच गं घुमा’बद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये मुक्ता आणि नम्रतासह सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naach ga ghuma team surprise to mukta barve as she arrived in india video viral sva 00