‘नाच गं घुमा’ चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या चित्रपटाचं लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं आहे. हा चित्रपट स्त्री्प्रधान असून, लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा’ यांसारख्या स्त्रीप्रधान चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी तर केलीच; पण प्रेक्षकांच्या मनावरही भुरळ घातली. या पार्श्वभूमीवर आता ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचा उलगडा करीत यामागची गोष्ट लेखिका मधुगंधा यांनी सांगितली आहे.

हेही वाचा… करण कुंद्रा तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेता म्हणाला…

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मधुगंधा म्हणाली, “नाच गं घुमा ही वर्किंग वूमनची गोष्ट आहे. वर्किंग वूमनला आयुष्यात एक वेगळं प्रेशर असतं. छोटं वा मोठं असो; एका महिलेचं स्वत:च असं एक स्वप्न असतं. पण, संसार, नोकरी, मुलं, घर, कर्ज या रगाड्यामध्ये त्या इतक्या अडकतात की, त्यांची छोटी स्वप्नंही मनातच राहतात. मन म्हणतंय नाच गं घुमा; पण कशी मी नाचू. ही व्यथा आजच्या वर्किंग वूमनची आहे, असं मला वाटतं. म्हणून ‘नाच गं घुमा’ हे शीर्षक आहे.”

आजकाल अनेक मराठी सिनेमा, नाटकं ही स्त्रियांभोवती फिरणारी असल्याचं आढळतं. यात्बद्दल विचारलं असता, मधुगंधा म्हणाली, “हिंदीमध्ये असं म्हणतात की, एकट्या अभिनेत्रीला घेऊन सिनेमा तयार करणं आणि तो चालणं कठीण असतं. पण, मराठीमध्ये नेमकं उलटं होतं. याचा एक मराठी माणूस म्हणून मला खूप अभिमान वाटतो.” तर यावर मुक्ता बर्वे म्हणाली, “स्त्रीप्रधान चित्रपट व्हायला हवेत. स्त्रियांचं कदाचित आयुष्य असेल तेवढं इंटरेस्टिंग. स्त्रिया आयुष्यात खूप मल्टीटास्किंग करीत असतात. एकाच वेळी त्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेल्या असतात.”

हेही वाचा… प्रियांका चोप्राचा भाऊ लवकरच अडकणार लग्नबंधनात; रोका विधी पार पाडत शेअर केली गुड न्यूज

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, १ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वेसह नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने, सारंग साठ्ये, आशा ज्ञाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naach ga ghuma writer madhugandha kulkarni revealed reason behind title dvr