बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ‘टायगर ३’मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचाही अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. बॉक्स ऑफिसवर दोन हिंदी चित्रपट आणि दोन मराठी चित्रपट आमने सामने बऱ्याचदा आले आहेत.

यंदाची दिवाळी मात्र खास असणार आहे, कारण दिवाळीच्या महूर्तावर जरी सलमानचा ‘टायगर ३’ प्रदर्शित होत असला तरी त्याला टक्कर देण्यासाठी २ मराठी चित्रपटही यंदा त्याचदरम्यान प्रदर्शित होत आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ व सुजय डहाके यांचा ‘श्यामची आई’ हे दोन्ही मराठी चित्रपट येत्या १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत.

Chhaava
‘छावा’ चित्रपटाच्या तिकिटांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू; ४८ तासांत ‘इतक्या’ लाख तिकिटांची विक्री
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
chhaava new song aaya re toofan release now marathi singer vaishali samant
मुघलांशी संघर्ष ते सिंहाचा जबडा फाडला…; ‘छावा’च्या नव्या गाण्याला मराठमोळ्या गायिकेचा आवाज; अंगावर येईल काटा, सर्वत्र होतंय कौतुक
Festival of 16 films by German director Wim Wenders
जर्मन दिग्दर्शक विम वेंडर्स यांच्या १६ चित्रपटांचा महोत्सव; या चित्रपटांचे खेळ
OTT Release In February first week
या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा वेब सीरिज व चित्रपटांची यादी!
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Maharashtrachi Hasya Jatra nikki tamboli
“मी कोकणात शिमग्याला जातेय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये भन्नाट स्किट सादर करणार निक्की तांबोळी, समोर आला प्रोमो

आणखी वाचा : अर्जुन व भूमीचा ‘द लेडी किलर’ हा अर्धवट चित्रपट; चार दिवसांत विकली गेली केवळ २९३ तिकिटे अन्…

सध्या ‘नाळ २’ व ‘श्यामची आई’ या दोन्ही चित्रपटांची मनोरंजविश्वात चांगलीच च र्चा आहे. ‘नाळ’चा पहिला भाग चांगलाच यशस्वी झाल्याने याच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक आतुर झाले आहेत. तर ‘श्यामची आई’मधून साने गुरुजी यांच्या आयुष्याचे वेगळे पैलू सुजय डहाके व त्यातील इतर कलाकार मिळून उलगडणार आहेत. ओम भूतकर, संदीप पाठक, ज्योति चांदेकर, गौरी देशपांडेसारखे कलाकार या चित्रपट महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सलमान कतरिनाचा ‘टायगर ३’ हा १२ नोव्हेंबरला जरी प्रदर्शित होत असला तरी हे दोन्ही मराठी १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ‘टायगर ३’ला ‘नाळ २’ व ‘श्यामची आई’ या दोन्ही चित्रपटांशी कडवी झुंज द्यावी लागणार हे निश्चित आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफ व इम्रान हाशमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भाईजानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. यश राज स्पाय युनिव्हर्सच्या या चित्रपटात शाहरुख खान व हृतिक रोशन यांचासुद्धा कॅमिओ पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Story img Loader