Naal 2 Marathi Movie Review: एखाद्या चित्रपटाचा सीक्वल म्हणजेच पुढील भाग येणं ही फार मोठी गोष्ट आहे, किमान मराठी मनोरंजनविश्वात तर ही फारच वेगळी गोष्ट आहे. परंतु कधीकधी मराठीत येणारे हे सीक्वल हे केवळ प्रेक्षकांना भुलवणारेच असतात, असे फार कमी सीक्वल आहेत जे खरंच लोकांसमोर येणं गरजेचं आहे त्यापैकीच एक नुकताच प्रदर्शित झालेला ‘नाळ २’ हा चित्रपट. हा चित्रपट केवळ जुन्या भागाची लोकप्रियता व मिळलेलं यश यांची पुनरावृत्ती करण्यासाठी काढलेला नव्हे. खरंच याच्या दुसऱ्या भागातून एक अत्यंत साधी, सोपी पण तितकीच हृदयस्पर्शी अशी कथा मांडलेली आहे जी आजच्या काळात लोकांसमोर येणं फार गरजेचं आहे. आजकाल ओटीटी व एकूणच चित्रपटांमधून समोर येणारी हिंसा, अश्लीलता, शिवीगाळ या सगळ्या गदारोळात ‘नाळ २’सारख्या तुमच्या हृदयाला हात घालणाऱ्या चित्रपटाची फार गरज आहे.

‘सैराट’ची सिनेमॅटोग्राफी हाताळणाऱ्या सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या या कथेच्या पहिल्या भागात आपण चैत्या व त्याची खऱ्या आईला भेटण्यासाठी चाललेली धडपड पाहिली होती, याबरोबरच त्या भागाच्या शेवटच्या सीनने तर कित्येकांना रडवलंही होतं. आता चैत्या मोठा झाला असला तरी या दुसऱ्या भागात त्याची धडपड थांबलेली नाही. या भागात चैत्या त्याची बहीण रेवती म्हणजेच चिमी या दोघांच्या नात्याची एक अत्यंत गोड गोष्ट आपल्यासमोर सादर करण्यात आली आहे. आई-मुलाप्रमाणेच भाऊ-बहिणीचं नातंही फार निर्मळ असतं मग ते रक्ताचं असलं काय अन् नसलं काय त्याने काहीच फरक पडत नाही. अगदी हीच गोष्ट या दुसऱ्या भागात फार उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

आणखी वाचा : Sam Bahadur Trailer: “हमारी वर्दी का गौरव हमेशा…” विकी कौशलच्या बहुचर्चित ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

गोष्ट अगदी साधी अन् सरळ आहे. आपल्या आत्याच्या गावी काही दिवस राहायला आलेल्या चैत्या जेव्हा आपल्या पोटच्या आईच्या घरी जातो तेव्हा त्याच्या चिमुरड्या बहिणीशी म्हणजेच चिमीशी व मोठा भाऊ मणीशी ओळख होते. पहिले काही दिवस चैत्याला आपला भाऊ मानायला तयार नसलेली चिमी हळूहळू कशी बदलते अन् शेवटी चैत्या, चिमी व मणी यांच्यातील नातं आणखी कसं घट्ट होतं ही या चित्रपटाची कहाणी आहे. याबरोबरच लहान मुलांच्या या निरागस स्वभावातून मोठ्यांनाही दोन शहाणपणाच्या गोष्टी या कथेतून सांगण्यात आल्या आहेत. पटकथा सुरेख बांधली असून कुठेही फाफटपसारा नसल्याने चित्रपट कथेशी प्रामाणिक राहतो. चित्रपटाची लांबी थोडी कमी करता आली असती तर कदाचित प्रभाव पाडण्यात आणखी यशस्वी झाला असता, परंतु त्यामुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव नक्कीच खराब होत नाही हे नक्की.

याची निर्मिती व संवालेखन नागराज मंजुळे यांनी केलं आहे अन् ते अगदी चपखल बसलं आहे. अगदी मोजकेच संवाद व त्या लहान मुलांच्या चेहेऱ्यावरील हावभाव यातूनच सगळी गंमत आपल्यासमोर उलगाडताना दिसते. अगदी साधी कथा असली तरी कुठेही रटाळ वाटू न देता अत्यंत रंजक पद्धतीने सीन्स आपल्यासमोर रंगवण्यात आले आहेत. सिनेमॅटोग्राफी हा तर चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि सुधाकर स्वतः त्या क्षेत्रातले तज्ञ असल्याने यातील प्रत्येक फ्रेमवर घेतलेली मेहनत पडद्यावर दिसून येत आहे. खासकरून गावाकडील छोट्या छोट्या गोष्टींचं चित्रीकरण आणि काही एरियल शॉट्स तर लाजवाब झाले आहेत. ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं संगीत छान आहे, ‘भिंगोरी’ हे गाणं तर अक्षरशः प्रेक्षकांच्या तोंडावर बसलं आहे, अद्वैत नेमळेकर यांचं बॅकग्राऊंड स्कोअरसुद्धा छान झाला आहे, पण तरी राहून राहून ते कुठेतरी कमी पडलंय असं वाटतं.

अभिनयाच्या बाबतीत नागराज मंजुळे व देविका दफ्तरदार यांची कामं उत्तम झाली आहे. दीप्ती देवी हिला मोजकेच सीन्स असले तरी तीने त्यातून स्वतःची छाप पाडली आहे. चैत्याचे खरे वडील म्हणजेच जितेंद्र जोशीचं पात्र या कथेत थोडं अपूर्ण वाटलं, जितेंद्र जोशीने काम चोख केलं आहे परंतु त्याच्या पात्रावर म्हणावी तशी लिखाणात मेहनत न घेतल्याने ते पात्र तुमच्या मनाला भिडत नाही. बाकी श्रीनिवास पोकळे, त्रीशा ठोसर व भार्गव जगताप या तिघांची कामं फारच उत्तम झाली आहेत. स्क्रीनवरचा त्यांचा नैसर्गिक वावर आणि एकूणच त्यांची निरागसता यामुळे हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करतो, खासकरून क्लायमॅक्सला चिमीच्या भूमिकेतील लहानग्या त्रीशाचं काम पाहून तुम्ही नक्कीच भावुक व्हाल. इतरही सहकलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. एकूणच आजच्या या धकाधकीच्या जीवनात एक शांत, संयत आणि हृदयस्पर्शी असा, साधं पण प्रभावी कथानक असलेला चित्रपट पाहायचा असल्यास ‘नाळ २’ तुम्ही नक्की पाहू शकता.

Story img Loader