झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटाच्या पहिल्या भागात चैत्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता दुसऱ्या भागात आणखी एका व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात चिमी हे पात्र अभिनेत्री त्रिशा ठोसरने साकारले आहे. नुकतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी तिची निवड कशी झाली? याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : ‘टायगर ३’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडणार? रिलीजच्या अगोदरच चित्रपटाने कमावले ‘एवढे’ कोटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

”मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करत होतो. ज्यावेळी ‘चिमी’चे पात्र लिहिले गेले, त्यानंतर आमचा शोध सुरु झाला. त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितकी उत्तम. त्या दृष्टीने आमचे शोधकार्य सुरु होते.

अनेक ऑडिशन्स आल्या. आमचे एक होते की, शक्यतो नवा चेहरा असावा. कारण आधी काम केलेले बालकलाकार तसे अनुभवी असतात. आम्हाला नैसर्गिक अभिनय हवा होता. आमच्या टीमने तिची ॲाडिशन घेतली. आम्हाला सगळ्यांनाच ती आवडली. म्हणून आमच्या टीममधून काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे. तिचे ऑडिशन घ्यायचे. ती कशी वावरते, बोलते या सगळ्याचे निरीक्षण केले. यानंतर आम्हाला आमची ‘चिमी’ सापडली. त्यावेळी ती फक्त साडेतीन वर्षांची होती.

त्रिशा अतिशय गुणी मुलगी आहे. इतकी लहान असूनही तिने कधीच त्रास दिला नाही. आम्हाला कधी कधी वाटायचे दिवसभर चित्रीकरण ही करू शकेल ना? परंतु त्रिशा नेहमीच उत्साही असायची. संवादाचे ‘गिव्ह अँड टेक’ही तिने पटकन आत्मसात केले. तिचे पाठांतर अतिशय उत्तम आहे. विशेष म्हणजे सेटवरही त्रिशा सगळ्यांचीच लाडकी होती. आम्ही तिचा चौथा वाढदिवसही सेटवर साजरा केला होता, असा किस्सा या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सांगितला.

आणखी वाचा : खऱ्या आईला भेटायला गेलेला चैतू, गावकऱ्यांचं प्रेम अन्…; नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित

दरम्यान झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naal 2 movie how trisha thosar selected for the movie director share the story behind nrp
Show comments