सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच यातील कलाकारांचेही प्रेक्षक प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे. नुकतंच या चित्रपटात मणीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड कशी झाली, याचा किस्सा समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात ‘मणी’ची भूमिका भार्गव जगतापने साकारली आहे. भार्गवची नाळ २ या चित्रपटाची निवड अगदी योगायोगाने झाली. भार्गवचे वडील रत्नकांत जगताप हे मनोरंजन क्षेत्रात निर्माते म्हणून कार्यरत आहेत. ते भार्गवसाठी कधीही शब्द टाकू शकत होते, परंतु त्यांनी आधी शिक्षणाला प्राधान्य दिले. एकदा एका चित्रपटाच्या प्रिमिअरला रत्नकांत जगताप भार्गवला घेऊन गेले होते.
आणखी वाचा : “…म्हणून आम्ही चिमीसाठी त्रिशाची निवड केली”, ‘नाळ २’ चित्रपटातील दिग्दर्शकांनी सांगितला ‘तो’ किस्सा

त्यावेळी ‘नाळ भाग २’च्या कास्टिंग डिरेक्टरच्या नजरेत भार्गव आला. त्याची निरागसता, ग्रामीण व्यक्तिमत्व त्यांना भावले. यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवला ‘मणी’ची भूमिका साकारण्याबाबत विचारणा केली. इतक्या मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली, हे म्हटल्यावर रत्नकांत जगताप यांनी होकार दिला.

या भूमिकेसाठी भार्गवचे ऑडिशन झाले. त्याबरोबर १४ दिवसांचे वर्कशॉपही झाले. यानंतरच ‘नाळ भाग २’ च्या या तीन महत्वाच्या पात्रांमध्ये त्याची निवड झाली. ध्यानीमनी नसताना अशी संधी यावी, ही भार्गवसह त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. शहरी वातावरणात वावरलेल्या भार्गवने अवघ्या १४ दिवसांमध्ये ग्रामीण जीवन, तिथले भावविश्व, तिथले बालपण हे सगळे आत्मसात केले. त्याचा अनुभवही घेतला.

आणखी वाचा : खऱ्या आईला भेटायला गेलेला चैतू, गावकऱ्यांचं प्रेम अन्…; नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित

नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये नवोदितांना संधी देतात. त्यांची ही निवड नेहमीच योग्य ठरते. भार्गवच्या बाबतीतही तेच घडले. ‘नाळ भाग २’च्या निमित्ताने भार्गवची नाळ चित्रपटसृष्टीशी जोडली गेली. दरम्यान झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naal 2 nagraj manjule how bhargav jatap cast for mani charchter know the story behind nrp