प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे त्यांच्या आगामी ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आकाश ठोसर, सयाजी शिंदे व सायली पाटील मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या नागराज मंजुळे व इतर कलाकार ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नागराज मंजुळेंनी महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर रील बनवला आहे. नागराज मंजुळेंनी पीएसआय पल्लवी जाधव यांच्याबरोबर चित्रपटातील हान की बडीव या गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये नागराज मंजुळे पोलिसांची काठी उडवून, गोल फिरवताना दिसत आहेत. महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबरचा नागराज मंजुळेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> कोण आहे शोभिता धुलिपाला? नागाचैतन्यला डेट करण्याआधी ‘या’ व्यक्तीबरोबर होतं अफेअर

नागराज मंजुळेंबरोबर व्हिडीओत दिसणाऱ्या पल्लवी जाधव दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांना मॉडेलिंगचाही छंद आहे. २०२० साली जयपूर येथे पार पडलेल्या ‘मिस ग्लॅमन इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत त्या रनर अप ठरल्या होत्या.

हेही वाचा>> Video: “हर हर शंभो” म्हणताच भारती सिंहच्या लेकाने काय केलं पाहा; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात नागराज मंजुळेंनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे. तर हेमंत अवताडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.