नागराज मंजुळेंचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ७ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात नागराज मंजुळे दबंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’नंतर नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिरयानी’ साठी प्रेक्षक उत्सुक होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे अनेक मुलाखती देत आहेत. सुरुवातीपासूनच या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात टीम व कलाकार व्यग्र आहेत. नुकतंच नागराज मंजुळे व सयाजी शिंदेंनी ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रमोशनतकरिता एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या माझा कट्टाला हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

हेही वाचा>> MTV Rodiesमध्ये रिया चक्रवर्ती बनणार गँग लीडर, व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त, म्हणाले “सुशांत सिंह राजपूत…”

हेही वाचा>> “…म्हणूनच नवऱ्याने सोडलं असेल”, ‘स्टार प्रवाह’वरील नवी मालिका चर्चेत; ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा रंगली आहे. नागराज मंजुळेंना मुलाखतीत ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचा सिक्वेल येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नागराज मंजुळेंनी नेमकं उत्तर दिलं नाही. पण ते हसून म्हणाले, “हो येणार आहे”. “प्रेक्षकांना आवडला तर पुढचा भाग नक्की येणार,” असंही पुढे नागराज मंजुळे म्हणाले.

हेही वाचा>> Video: केक कापला, मिठी मारली, किस केलं अन्…; अंकिता लोखंडेचा पतीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात नागराज मंजुळेंसह सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हेमंत अवताडेंनी दिग्दर्शन केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagaraj manjule talk about ghar banduk biryani sequel during movie promotion interview kak