या वर्षाच्या सुरुवातीला मराठीतील आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा केली होती. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे या बायोपिकचे दिग्दर्शन करत आहेत.
१९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे ऐतिहासिक पदक जिंकणाऱ्या आणि स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकणाचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठी मातीतील विस्मृतीत गेलेल्या एका झुंजार नायकाचा असाधारण जीवनप्रवास खाशाबा चित्रपटाच्या निमित्ताने मांडला जाणार आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट खाशाबाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा केली आहे.
मधुरा वेलणकरने केलं सासरे शिवाजी साटम यांचं कौतुक; म्हणाली, “माझ्या लग्नानंतर…”
‘सैराट’नंतर ही माझी तिसरी मराठी फिल्म आहे. जिओ स्टुडिओज सोबत या महत्वाकांक्षी निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. मागच्या तीन वर्षांपासून आम्ही ‘खाशाबा’ची तयारी करत आहोत. आज याचं चित्रीकरण सुरू होत आहे याचा मला आनंद आहे,’ असं नागराज मंजुळे म्हणाले. दरम्यान, ‘खाशाबा’ हा चित्रपट २०२५ मध्ये जगभरात प्रदर्शित केला जाईल.