बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. नागराज मंजुळे या चित्रपटात डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर व गाण्यांमधून नागराज मंजुळेंनी साकारलेल्या दबंग पोलीस अधिकाऱ्याची झलक पाहायला मिळत आहे. आता ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झी स्टुडिओच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवरुन ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या नागराज मंजुळेंचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. या चित्रपटात नागराज मंजुळेंच्या पत्नीची भूमिका दिप्ती देवीने साकारली आहे. या व्हिडीओमध्ये पत्नी व त्यांच्यातील संवाद पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>> “मी दोन वेळा पोलीस भरतीसाठी…” आकाश ठोसरचा खुलासा, म्हणाला “सैराटनंतर…”

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील या व्हिडीओमध्ये नागराज मंजुळे पोलीस स्थानकात बसलेले दिसत आहेत. “हॅलो मी मॉनस्टर बोलतोय,” असं ते बोलताना दिसत आहेत. चित्रपटातील त्यांच्या मुलीने फोन उचलत “मी मॉनस्टरची मम्मी बोलतेय” असं म्हणते. त्यावर नागराज मंजुळे म्हणतात, “कुठे गेली हडळ”. तेवढ्यात दिप्ती आल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. “आता मी हडळ आहे का? प्रेमात होतास तेव्हा खूप गुलूगुलू बोलायचास..मी हडळ आहे तर तू खवीस आहेस…” असं म्हणाल्यावर पोलीस स्थानकातील इतर पोलीस त्यांच्यावर हसताना दिसत आहेत. चित्रपटातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांना नागराज मंजुळेंचा हा हटके अंदाज आवडल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> Video: “बहरला हा मधुमास…” गाण्याची डान्सिंग डॅडलाही पडली भुरळ, अमेरिकन सोशल मीडिया स्टारचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> Video: दबंग महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर नागराज मंजुळेंनी बनवला रील; काठी उडवली, गोल फिरवली अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात नागराज मंजुळेंसह आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे या कलाकारांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. हेमंत अवताडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून नागराज मंजुळेंनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule ghar banduk biryani akash thosar video goes viral kak