सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाला २०१८ ला अभूतपूर्व यश मिळाले. या चित्रपटातील गोड चैतूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘नाळ २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात चैतू, चिमी आणि मणी या तिघांची पार्श्वभूमी सांगण्यापासून होते. चैतू त्याच्या खऱ्या आईला भेटायला जाण्याचा हट्ट करतो. तिथे गेल्यानंतर त्याला त्याचे खरे बाबा, त्याची बहीण (चिमी) आणि भाऊ (मणी) भेटतो. त्यानंतर मग चैतूचे कुटुंबात होणारे स्वागत, त्याची चिमीशी होणारी मैत्री आणि त्यानंतर दोन भावांमध्ये होणारे भांडण याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : अक्षया देवधरचे पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण, ‘या’ चित्रपटात सायली संजीवबरोबर शेअर करणार स्क्रीन

‘नाळ २’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चिमुकल्या गोंडस चिमीकडे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. त्याबरोबरच या चित्रपटातील शूटींगच्या स्थळानेही लक्ष वेधून घेतलं आहे. नदी, दऱ्या, डोंगर, घरे असे निसर्गसौंदर्य या चित्रपटात अतिशय सुरेखरित्या दाखवण्यात आले आहे. ‘नाळ’मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला ‘नाळ भाग २’ मध्ये मिळणार आहे.

आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे हा चैतन्य म्हणजे चैत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याबरोबरच नागराज मंजुळे हे चैत्याचे वडील आणि दीप्ती देवी पार्वती म्हणजे चैत्याची खरी आईचे पात्र साकारत आहे.