दिग्दर्शक नागराज मंजुळे आज मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी कायमच सशक्त कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवला आहे. आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बापल्योक’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
‘बापल्योक’ या चित्रपटात बाप लेकाचा प्रवास मांडला जाणार आहे. या चित्रपटाद्वारे बाप आणि लेकाचा भावनिक विषय मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”
नागराज मंजुळे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले केले आहे. त्यात एक चौकनी कुटुंब पाहायला मिळत आहे. यात एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण पाहायला मिळत आहे. यात ते सर्वजण त्या मुलाकडे कौतुकाने बघत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. येत्या २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.