दिग्दर्शक नागराज मंजुळे मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फॅन्ड्री’, ‘नाळ’, ‘सैराट’ या चित्रपटांचे खूप कौतुक झाले. तर सध्या ते त्यांच्या ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. काल हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता अशातच नागराज मंजुळे यांची जुनी मुलाखत खूप व्हायरल होत आहे. त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेल्याचा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागराज मंजुळे यांना त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीमध्ये राष्ट्रीय पुरस्काराचाही समावेश आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. परंतु त्यांच्या घरातून काही वर्षांपूर्वी हा पुरस्कार चोरीला गेला. काही दिवसांपूर्वी ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तेव्हा नक्की काय झाले होते हे सांगितले.

आणखी वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

नागराज मंजुळे म्हणाले, “आम्ही ‘फॅन्ड्री’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. या चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता. म्हणून आई आणि भाऊसुद्धा सेटवर आले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. हीच संधी चोरांनी साधली आणि आमच्या घरात चोरी केली. नेमका माझा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी चोरला.”

हेही वाचा : “‘घर बंदूक बिरयानी’मध्ये परश्या आहे पण आर्ची का नाही?”; नागराज मंजुळेंनी केला खुलासा, म्हणाले…

पुढे ते म्हणाले, “नंतर मी त्या चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मी त्याला शोधत बसलो असतो तर माझ्या कामावर मला नीट लक्ष देता आले नसते आणि त्याचा परिणाम माझ्या आगामी चित्रपटांवर झाला असता. तसेही मला मिळालेली ट्रॉफी चोरीला गेली आहे, पण तो पुरस्कार माझ्याच नावावर नोंद आहे. त्यामुळे मला या गोष्टीचा फारसा फरक पडला नाही.” तर यानंतर त्यांना ‘फॅन्ड्री’ चित्रपटासाठीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आता त्यांची ही मुलाखत खूप चर्चेत आली असून सर्व जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule revealed that thieves stole nagraj manjules national award rnv