मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. समाजाचं धगधगतं वास्तव दाखवणाऱ्या या चित्रपटातून दाखवण्यात आलं होतं. आकाश ठोसर व रिंकू राजगुरूने ‘सैराट’मधून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील परश्या व आर्चीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सैराट’ चित्रपटाने आकाश व रिंकूला लोकप्रियता मिळवून दिली. पहिल्याच चित्रपट सुपरहिट ठरल्याने ते प्रसिद्धीझोतात आले. आजही प्रेक्षक परश्या व आर्चीवर तितकंच प्रेम करतात. २९ एप्रिल २०१६ साली ‘सैराट’ सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने आकाश ठोसरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा>> पाणावलेले डोळे, भांगेत कुंकू अन्…; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील सीतामातेबद्दलची ‘ती’ चूक सुधारली

आकाशने ‘सैराट’ चित्रपटाचं पोस्टर त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केलं आहे. “सैराटला सात वर्ष पूर्ण झाली,” असं कॅप्शन आकाशने या पोस्टला दिलं आहे. आकाश या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. “अजूनही चित्रपट थिएटरला लागला तर आधीसारखी गर्दी होईल, ” अशी कमेंट केली आहे. तर कित्येकांनी “पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहावासा वाटतो, ” असंही म्हटलं आहे.

हेही वाचा>> आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना स्वरा भास्करचा पाठिंबा, ट्वीट करत म्हणाली, “बलात्काऱ्यांना…”

‘सैराट’मुळे घराघरात पोहोचलेल्या आकाशने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’मध्येही तो दिसला होता. त्याचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule sairat movie 7 years completed akash thosar shared special post kak