दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा इतिहास रचला. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीमधील कमाईचे सारे विक्रम मोडले. या चित्रपटामधून आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु, परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसर आणि परश्याच्या मित्रांच्या भूमिकेतील अरबाज शेठ, तानाजी गालगुंडे हे चौघेही प्रकाश झोतात आले. या चित्रपटामध्ये ‘लंगड्या’ची भूमिका साकारणाऱ्या तानाजीचं तर आयुष्यच बदललं.
‘सैराट’नंतर तानाजीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याने पुढेही काही चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तानाजीने ‘घर बंदुक बिरयानी’ या चित्रपटाच्यानिमित्ताने त्याचं आयुष्य कशाप्रकारे बदललं याबाबत भाष्य केलं. शिवाय इतर सामान्य व्यक्तींप्रमाणे तानाजीला चालत येत नव्हतं. आता त्याने स्वतःवर लाखो रुपये खर्च केला आहे.
कसं बदललं तानाजी गालगुंडेचं आयुष्य?
तानाजी म्हणाला, “चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी मी शेती करत होतो. शेती करत करत मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. पण माझ्या या कामाला मर्यादा होत्या. तेच काम करत राहिलो असतो तर मी अजूनही गावातच असतो. माझी प्रगती झाली नसती. चित्रपटांमध्ये काम करत असताना माझा अवाका वाढला. सगळ्यात महत्त्वाचं मला चांगली माणसं मिळाली. टीम चांगली मिळाली. चार पुस्तकं वाचता आली. आता हळूहळू प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे”.
आणखी वाचा – अशोक सराफ यांचा सख्खा भाऊ करतो ‘हे’ काम, भावावर आहे जीवापाड प्रेम, निवेदिता फोटो शेअर करत म्हणाल्या…
“माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झाले. माझ्या पायाची एक वेगळीच गोष्ट आहे. माझ्या पायांची मी शस्त्रक्रिया करुन घेतली. शेतीचं करत राहिलो असतो तर माझे पाय कधीच नीट झाले नसते. आतापर्यंत मी आठ ते दहा लाख रुपये पायावर खर्च केले. हे सगळं श्रेय फक्त ‘सैराट’ चित्रपटाला आहे. माझे दोन्हीही पाय आता जवळपास सरळ झाले आहेत. याचाच अर्थ आर्थिकदृष्ट्याही मी सक्षम झालो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुखकर झालो. मला पाहिजे ती गोष्ट मी करतो. अण्णांमुळे (नागराज मंजुळे) मी इथे आहे”. तानाजी आता पूर्वीपेक्षा खूपच बदलला आहे. तसेच त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे.