मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णीबद्दल सांगितलं आहे. गार्गी आपला आरसा आहे. आपण कोणताही चित्रपट बनवताना तिचं मत महत्त्वाचं असतं. माझ्या लिहिलेल्या प्रत्येक पटकथा गार्गी वाचते, असं नागराज मंजुळे म्हणाले. त्यांची व गार्गीची पहिली भेट कुठे झाली होती, याबद्दलही त्यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही बाबासाहेबांचा फोटो बाहेर फेकलात तर…” वडिलांच्या धमकीला नागराज मंजुळेंनी दिलेलं प्रत्युत्तर

‘मुंबई तक’शी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, “आम्ही अहमदनगरला शिकायला एकत्र होतो, तेव्हा मी आणि गार्गी भेटलो. गार्गीला वाचायची आवड आहे, ती स्वतः कविता लिहिते. मी जेव्हा कोणतीही पटकथा लिहितो, तेव्हा ती दोन माणसांना आवर्जून ऐकवतो. त्यांच्या होकार-नकारात किंवा चांगलं-वाईट सांगण्यावरून मला आत्मविश्वास येतो किंवा परत एकदा विचार करायचा का, याची मला जाणीव होते. जेव्हा मी फँड्री लिहिला तेव्हा गार्गी एकटीच होती, जिला पटकथेतलं कळायचं, त्यामुळे मी गार्गीलाच पटकथा लिहून ऐकवतो.”

गार्गीच्या कवितांचं कौतुक करत नागराज म्हणाले, “माझ्या चित्रपटाच्या कथेची प्रोग्रेस बघणारी गार्गी आहे. गार्गीची साहित्य व कलेची समज खूप चांगली आहे. ती खूप चांगली कविता लिहिते. मी कविता लिहून तिला पाठवायचो, पण ती माझ्यापेक्षा चांगलं लिहिते असं तिला कधीच वाटायचं नाही. तिच्या कविता छापून आल्यात. तिने मोजकं लिहिलं, ती फार लिहित नाही पण खूप छान लिहिते. आता एकत्र जगतोय तर ते आहेच. कुतूब, गार्गी, प्रियांका ही माझी नेहमीची टीम आहे. कुतूब एडिटिंग करतो. माझ्या डोक्यात जेव्हा एखादा चित्रपट करायचं चालू असतं तेव्हा गार्गी कुतूबचं म्हणणं असतं की तू हे कर, ते नको करू. बऱ्याचदा ते डोळे झाकून विश्वास ठेवावं असं असतं. गार्गी प्रोड्युसर असते त्यामुळे माझे व्यवहार तिच सांभाळते. पण मी जे क्रिएटीव्ह करतो त्यात तिचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. ती माझा आरसा आहे, असं म्हणायला हरकत नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjule talks about wife gargee kulkarni she is my mirror reads all script of mine hrc